संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे गावचे सुपूत्र आणि सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक व जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री. संदेश गजानन साळवी यांच्याकडून शाळेला मोफत टॅब आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. Gifts to Khodde School from Sandesh Salvi
यावेळी खोडदे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी पूजा गुरव, सामाजिक कार्यकर्ते आणि शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ श्री विलास गुरव, माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक गुरव, सुनिती वैद्य, शर्वरी साळवी, मयूरी साळवी, शाळेचा मुख्याध्यापिका सौ.प्रीता गावड, सहशिक्षिका सौ.संध्या पाटील यांचेसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. Gifts to Khodde School from Sandesh Salvi