• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 August 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर असगोली मिडीबसचा रेडीएटर पाईप फुटला

by Mayuresh Patnakar
December 21, 2024
in Guhagar
135 2
0
Radiator pipe of Midibus burst
266
SHARES
760
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अनेकजण भाजले, मात्र गंभीर कोणीही नाही

गुहागर, ता. 21 : असगोलीहून प्रवाशांना घेवून येणारी बस बँक ऑफ इंडिया जवळ थांबली होती. त्याचवेळी मिडीबसच्या रेडीएटरचा पाईप फुटला. रेडीएटरमधील उकळते, हिरवे पाणी पाईपमधुन वेगाने बाहेर पडले. हे गरम पाणी बँक ऑफ इंडियाजवळ उतरणारे प्रवासी आणि गाडीतील अन्य प्रवाशांच्या अंगावर उडून 20 ते 25 जण भाजले. या गोंधळात एक महिला गाडीतून उतरताना पडून जखमी झाली. दोन जखमींवर ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे उपचार सुरु आहेत. Radiator pipe of Midibus burst

गुहागर शहरापासून 5 कि.मी. अंतरावर, एका बाजुला असलेल्या असगोली गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी, नोकरदार अशी शेकडो मंडळी दररोज गुहागरात येत असतात. या ग्रामस्थांसाठी एस.टी. महामंडळ मिडीबसद्‍वारे सेवा देते. या गावात जाणारा अरुंद रस्ता, मोठ्या गाडीवर कॅरीयर असल्याने झाडाच्या फांद्या लागणे, वेगवेगळ्या वायर तुटण्याचा धोका तसेच गुहागर बाजारपेठ नाक्यातील तीव्र वळण यामुळे एस.टी.ची मोठी गाडी असगोली गावात पाठवली जात नाही. सध्या उपलब्ध असलेली एकमात्र मिडीबस केवळ गुहागर आगारातील तांत्रिक कर्मचाऱ्यांमुळे सुरु आहे. महाराष्‍ट्र राज्य परिवहन मंडळाकडे अनेकवेळा मागणी करुनही छोट्या बस गाड्यांची व्यवस्था महामंडळाने गुहागरसाठी केलेली नाही. Radiator pipe of Midibus burst

काल सकाळी 10.00 वा. गुहागरातून असगोलीला गेलेली मिडीबस सकाळी 10.30 च्या सुमारास गुहागर खालचापाट येथील बँक ऑफ इंडिया समोर आली. यावेळी मिडीबसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. बँकेत कामाला जाणाऱ्या मंडळींना उतरविण्यासाठी मिडिबस थांबली. त्याचवेळी मिडीबसच्या रेडीएटरचा पाईप फुटला. पाईपमधुन गरम, हिरव्या पाण्याचा फवारा उडाला. या गरम पाण्यामुळे 20 ते 25 जणांचे पाय भाजले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. काहीतरी अघटीत घडेल या भितीने गाडीतील प्रवासी बाहेर पडण्यासाठी धावपळ करु लागले. या धावपळीत दळणासाठी आणलेला डबा घेवून उतरणाऱ्या एका वयस्कर महिलेचा तोल गेला आणि ती गाडीबाहेर रस्ता आणि गटार यामध्ये विचित्र पध्दतीने पडली. तर एका महिला या धावपळीत घसरुन पडली. या दोन महिलांना गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच शिवसेनेचे नेते राजेश बेंडल यांनी रुग्णालयात जावून या महिलांची भेट घेतली. Radiator pipe of Midibus burst

दरम्यान मिडीबस नादुरुस्त झाल्याने आज दुपारनंतरच्या असगोलीतील सर्व फेऱ्या एस.टी. महामंडळाला रद्द कराव्या लागल्या. गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांनी वेगाने मिडीबसच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे लवकरच वेळापत्रकाप्रमाणे मिडीबस सुटेल असा प्रयत्न आम्ही करत असल्याचे आगारातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. Radiator pipe of Midibus burst

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRadiator pipe of Midibus burstUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share106SendTweet67
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.