मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
नागपूर, ता. 20 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिनींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. Ladaki Baheen Yojana
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशे रुपयांचे एकविसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला होता. हिवाळी अधिवेशानात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरुन एकवीसशे रुपये करु असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. Ladaki Baheen Yojana
महायुती सरकारने सुरु केलेली एकही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृत सांगितले. लाडकी बहिण या योजनेच्या निकषात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. Ladaki Baheen Yojana
राज्यात महायुतीचे सरकार येऊन जवळपास महिना झाला. परंतु, अजूनही डिसेंबर महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नसून कधी जमा होणार? याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. विधानसभाआधी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हफ्त्यात १५०० मिळतील की १५०० असा प्रश्न पडला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मात्र आधीप्रमाणेच १५०० रुपये मिळणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. Ladaki Baheen Yojana