कोकण कोस्टल मॅरेथॉन पर्व दुसरे
रत्नागिरी, ता. 19 : कोकणवासीयांनी संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असं संबोधलं गेलंय त्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन दर वर्षीप्रमाणे नवीन वर्षात रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे. ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अंतर असलेली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन सालाबादप्रमाणे सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केली आहे. या स्पर्धेत विजेत्यांना ४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. Half Marathon in Ratnagiri
रन फॉर बायोडायव्हर्सिटी अशी संकल्पना घेऊन दुसऱ्या वर्षीची ही स्पर्धा होणार आहे. ५ किमीसाठी ७० मिनिट, १० किमी १२० मिनिटात आणि २१ किमी अंतर २१० मिनिटांत पूर्ण करायचे आहे. स्पर्धेची सुरवात थिबा पॅलेस रोडवरील हॉटेल मथुरा येथून होईल. २१ किलोमीटरसाठी नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोपमार्गे भाट्ये समुद्रकिनारा असा मार्ग आहे. १० किमीसाठी नाचणे, शांतीनगर व वळसा मारून मारुती मंदिर मार्गे भाट्ये आणि ५ किमीसाठी मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत स्पर्धक येतील. Half Marathon in Ratnagiri
रत्नागिरी जिल्हा एथलेटिक्स असोसिएशन च्या मान्यतेने होत असणारी ही मॅरेथॉन आहे. स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी पार्टनर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन असून रूट पार्टनर रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आहे. स्वच्छता पार्टनर रत्नागिरी नगरपरिषद आहे. तसेच अनबॉक्स हे या उपक्रमाचे H2O पार्टनर आहेत. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून देखील या उपक्रमाला भरीव प्रोत्साहन मिळाले आहे. बॅंक ऑफ इंडिया, पितांबरी प्रॉडक्टस, आर्यक सोल्यूशन्स हे सुद्धा या मॅरेथॉन चे प्रायोजक आहेत. Half Marathon in Ratnagiri
नोंदणीसाठी काही दिवस शिल्लक असून रजिस्ट्रेशन लिंक :
https://events.fitasf.com/konkan-coastal-2025.html या वर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रत्नागिरीकरांसाठी ऑफलाइन नोंदणी
तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन रजिस्टर करता येत नाहीये त्यांच्यासाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन रत्नागिरी शहरात जोशी फूड्स (हॉटेल मिथिला शेजारी), हॉटेल फ्लेवर्स (के सी जैन नगर), उत्कर्ष स्टेशनरी (हॉटेल कार्निवल शेजारी), हॉटेल कार्निवल इन, आनंदकल्प हॉस्पिटल (शांती नगर). या ठिकाणी जाऊन ऑफलाईन फॉर्म भरावा आणि फॉर्म वरती असलेला QR स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करावे. Half Marathon in Ratnagiri