संदेश कदम, आबलोली
गुहागर ता. 18 : शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मान. मंत्री योगेश (दादा) कदम यांच्या “पालखी” बंगल्यावर त्यांचा भगवी शाल, भुफे व चांदीची तलवार भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, सचिन धाडवे, दशरथ सकपाळ आदी मान्यवरांनी मंत्री योगेश (दादा) कदम यांना पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या. Yogesh Kadam felicitated on behalf of Shinde Party
माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते मा. रामदासभाई कदम यांचे सुपूत्र आणि दापोली मंडणगड तालुक्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा विरुद्ध शिवसेना शिंदे या पक्षात लढत रंगली या लढतीत शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजय कदम यांचा शिवसेना शिंदे पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार योगेश (दादा) कदम यांनी पराभव करुन २५ हजार मताधिक्यानी दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवला. योगेश (दादा) कदम यांच्या विजयात महायुतीच्या भाजपा, शिवसेना शिंदे, आर.पी.आय.आठवले, राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार या मित्र पक्षांचा महत्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे. योगेश दादा कदम हे दापोली मंडणगड तालुक्याचे आमदार तसेच शिवसेना (शिंदे) पक्ष आणि महायुतीचे मंत्री म्हणून योगेश (दादा) कदम यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. Yogesh Kadam felicitated on behalf of Shinde Party