गुहागर, ता. 18 : नेत्रावती एक्सप्रेसने प्रवास करीत असताना ३ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना करंजाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. Theft of jewels of a railway passenger
कामोठे नवी मुंबई येथील फिर्यादी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करित असताना करंजाडी रेल्वे स्टेशन येथे नेत्रावती एक्सप्रेस गाडीच्या गार्ड बाजुकडील पहिल्या जनरल डब्यात सीटवर बसून सिंधुदुर्ग ते कामोठे असा प्रवास करित असताना करंजाडी रेल्वे स्टेशन येथे आल्यानंतर ट्रेन स्लो झाली. याचा फायदा घेत अनोळखी इसम याने फिर्यादीचे पाठीमागून ३ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे दोन मंगळसुत्र खेचून चोरून चालू गाडीतून पळून गेला. याबाबत महाड तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Theft of jewels of a railway passenger