संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथील विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक सण-ऊत्सव करून ‘ट्रॅडिशनल डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विभाग प्रमुख प्रा.अमोल जड्याळ यांनी या ‘ट्रॅडिशनल डे’ चे सुयोग्य नियोजन करुन विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्या-त्या गटाचे प्रमुख नेमून त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवली होती. ‘Traditional Day’ in Talwali College
यामध्ये भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती व विशेष करून कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. वारकरी दिंडी, कोकणातील शिमगोत्सव, गणेश उत्सव, पारंपरिक लग्न सोहळा या सारख्या सण-ऊत्सवाचे आयोजन केले होते. वारकरी दिंडीमध्ये टाळ, मृदंग, वीणा या वाद्यांचा समावेश होता. ही सर्व वाद्ये विद्यार्थी स्वतः वाजवीत होते. विद्यार्थीनी डोक्यावर तुळस घेऊन वारीमध्ये सहभागी झाली होती. वारकरी रिंगणही केले होते. विशेष करून वारकरी वेशभूषा करूनच सर्व विद्यार्थी यात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे कोकणातील महत्त्वाचा सण म्हणजे शिमगोत्सव करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पालखीच्या आगमनानंतर, मोठ्या भक्तीभावाने पालखीची पुजा केली. तसेच गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न सोहळ्याला फार महत्त्व आहे. त्याप्रमाणे वधू-वरांना हळद लावणे, त्यांचे स्वागत करणे, पुष्पहार अर्पण करणे, अक्षता टाकणे, मंगळसूत्र घालणे इत्यादी विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले. यामध्ये काहीजण वधूपक्षा कडून तर काहीजण वर पक्षाकडून सहभागी झालेले दिसत होते. या लग्न सोहळ्यात सर्व विद्यार्थी मोठ्या आनंदात सहभागी झाले होते. ‘Traditional Day’ in Talwali College
तळवली कनिष्ठ महाविद्यालयात साजरा केलेल्या ‘ट्रॅडिशनल डे’ अतिशय सुंदर नियोजन व आयोजन केले होते. सहभागी विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वहात होता. या विद्यार्थ्यांना प्रा. जड्याळ , प्रा. जड्याळ मॅडम, प्रा.आयरे मॅडम व प्रा. सावंत मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्या बद्दल सहभागी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी जेष्ठ शिक्षक श्री.देवरुखकर, कला शिक्षक श्री.श्रीनाथ कुळे हेही उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शेवटी प्रा. जड्याळ यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. ‘Traditional Day’ in Talwali College