गुहागर, ता. 14 : तालुक्यातील कोंडकारूळ पंचायत समिती गणातील विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच गुहागर भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे व भाजपाचे युवा नेते निलेश दाते यांचे हस्ते पार पडले. Bhoomipujan of various development works
पालशेत येथील गुहागर तालुका भाजपाचे युवामोर्चा अध्यक्ष अध्यक्ष हरीश उर्फ सनी वेल्हाळ व सीताराम पटेकर, नितीन कनगुटकर यांनी गाव भेटी दरम्यान कोंडकारुळ, अडुर, नागझरी व पालशेत येथील भाजप कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गावभेटी दिल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थांनी सुचवलेली विविध विकास कामे मा. आमदार विनय नातू यांच्या प्रयत्नातून निलेश दाते यांनी ग्रामविकास मंत्री श्री गिरीषजी महाजन यांच्याकडून 25 /15 मधून मंजूर करून घेतली होती. सदरच्या कामाची भूमिपूजन नुकतेच पार पडले असून निलेश दाते यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ही विकास कामे सुरू झाली असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. Bhoomipujan of various development works
या भूमिपूजनाच्या वेळी भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, युवा नेते निलेश दाते, भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष हरिष वेल्हाळ, सिताराम पटेकर, विजय बेंदरकर, उपाध्यक्ष विपुल नार्वेकर, दिनेश देवळे, मोनीश पालशेतकर, नितीन कनगुटकर शक्ती केंद्रप्रमुख, राजेंद्र नरवणकर, निलेश घाणेकर व इतर भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. Bhoomipujan of various development works