गुहागर, ता. 14 : असुर्डे, आंबतखोल हायस्कूल येथे दि. 11,12,13 डिसेंबर 2024 रोजी 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील विविध शाळांनी विद्यार्थी मॉडेलस त्याचबरोबर शिक्षकांची मॉडेलस मांडली होती. यातील माध्यमिक शैक्षणिक साहित्य निर्मिती या गटातून दलवाई हायस्कूल, मिरजोळी येथील विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग आरेकर यांचा प्रथम क्रमांक आला. Arekar first rank in science exhibition
तालुकास्तरावर सौ. आरेकर मॅडम यांचा प्रथम क्रमांक येऊन त्या जिल्हास्तरासाठी पात्र झालेल्या आहेत. त्यांनी Effects of Electric Current हे मॉडेल सादर केले होते. त्याचबरोबर सौ. आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील दिव्यांग गट विभागातून कु.तनवी अरविंद गुढेकर आणि कु. श्रेया श्रीकृष्ण कदम यांनी लेझर सिक्युरिटी सिस्टीम हे मॉडेल सादर केले होते आणि या मॉडेल ला तालुकास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.रोहित जाधव त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Arekar first rank in science exhibition