रत्नागिरी, ता. 11 : येथील रा. भा. शिर्के हायस्कूलच्या १९७० च्या जुन्या अकरावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच रत्नागिरीत उत्साहात झाले. शाळेतील आठवणींना उजाळा या सर्व ज्येष्ठांनी बालपण अनुभवले. अकरावीच्या बॅचमधील विद्यार्थी २०१५ पासून हा उपक्रम राबवत आहेत. Reunion of the 1970 batch of Shirke College
रत्नागिरीत एकत्र येऊन सर्व माजी विद्यार्थी तालुक्यातील नेवरे येथे मधुरा रिसॉर्ट येथे पोहेचले. तिथे नाश्ता, जेवण व निवासाची सोय करण्यात आली. संध्याकाळच्या वेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ खेळण्यात आले. नंतर फेरफटका मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रात बोटी सफरीचा आस्वाद सर्वांनी घेतला. समुद्राच्या लाटांबरोबर सर्वांनीच आनंद घेतला. त्यानंतर नेवरे येथील लक्ष्मीनारायणाच्या पुरातन मंदिरात दर्शन घेण्यात आले. हे जागृत देवस्थान असून तिथे देवस्थानतर्फे मंदिराची माहिती देण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेला भेट देऊन तिथे श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर संध्याकाळी कर्ला येथे खाडीमध्ये बोटीतून सफर करण्यात आली. कर्ला ते नारायण मळीपर्यंत ही फेरी अतिशय आनंददायी होती. होडी व भोजनाची व्यवस्था गणेश धुरी यांनी केली होती. मनोरंजनाचे खेळ आणि कराओके गाण्यांवर सर्वांनी ठेका धरला. हे स्नेहसंमेलन अतिशय छान झाले आणि आपली वय विसरून बालपणाच्या आठवणीत रमून गेले. Reunion of the 1970 batch of Shirke College