• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

क्षत्रिय मराठा मंडळाचा वधू-वर मेळावा

by Guhagar News
December 11, 2024
in Ratnagiri
45 0
0
Kshatriya Maratha bride and groom gathering
88
SHARES
250
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 11 : येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्यावतीने टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित मराठा सप्तपदी वधू-वर मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात नवीन वधू-वर नोंदणी झाली. वधू आणि वर यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. Kshatriya Maratha bride and groom gathering

मेळाव्याची सुरवात मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सतिशराव साळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती प्राचीताई शिंदे, एमबीएफ रत्नागिरी चॅप्टर अध्यक्ष समीर इंदुलकर, आशाताई साळवी, प्रमोद निकम, संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष तावडे यांनी वधू-वर व पालकांना मार्गदर्शन केले. विवाह जमण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीतील अनुभव, अडचणींवर मात करून तडजोडीने विचार करून विवाह जमवण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्याबाबत मार्गदर्शन केले. Kshatriya Maratha bride and groom gathering

Kshatriya Maratha bride and groom gathering


उत्कृष्ट वधू-वरांसाठी स्वतःचा उत्तम परिचय करून देणाऱ्या वधू-वरांना बक्षिस जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे वधू डॉ. सिद्धी चाळके व वर सौरभ माने यांची निवड करण्यात आली व त्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकार डान्स अॅकॅडमीचे संचालक अमित कदम यांनी केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा वधू-वर मेळावा पार पडला. मराठा ज्ञाती बांधवांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्षत्रिय मराठा मंडळाने आभार मानले. Kshatriya Maratha bride and groom gathering

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKshatriya Maratha bride and groom gatheringLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share35SendTweet22
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.