Guhagar News : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतीय इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाली भाषेमध्ये आस्था होती. कारण पाली ही थेरवाद बौद्ध धर्मग्रंथांची भाषा आहे. डॉ. आंबेडकरांसाठी बौद्ध धर्म हा केवळ अध्यात्मिक मार्ग नव्हता तर सामाजिक आणि नैतिक परिवर्तनाचे साधनही होते. त्यामुळेच पाली भाषेत असलेल्या विशेष त्रिपिटक, बुद्धाच्या शिकवणुकीचा समावेश असलेले प्रमाणित ग्रंथ आदी साहित्याचा अभ्यास त्यांनी केला. Dr. Ambedkar and Pali Language
डॉ. आंबेडकर आणि पाली भाषा संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे :
पाली आणि बौद्ध धर्म : बौद्ध धर्म स्वीकारण्याचा आंबेडकरांचा निर्णय सामाजिक न्याय आणि वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी, विशेषत: उपेक्षित समुदायांसाठी एक मार्ग प्रदान करतो या त्यांच्या विश्वासावर खोलवर परिणाम झाला. मूळ बौद्ध ग्रंथांची भाषा म्हणून पाली ही भाषा त्यांच्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी आणि समजून घेण्यासाठी केंद्रस्थानी होती.
पाली भाषेचा पुरस्कार : आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांमध्ये, विशेषत: दलितांमध्ये पाली भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले, कारण त्यांचा असा विश्वास होता की बौद्ध धर्मग्रंथ त्यांच्या मूळ भाषेतील प्रवेशामुळे लोकांना बुद्धाच्या शिकवणींचा खरा अर्थ समजून घेता येईल. त्याला असे वाटले की भाषांतरे अनेकदा संदेशाचे मूळ सार सौम्य किंवा विकृत करतात.
बौद्ध ग्रंथांचे भाषांतर : भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये, आंबेडकरांनी बौद्ध शिकवणी व्यापक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य केले. त्यांचा पाली भाषेचा प्रचार हा लोकांना बौद्ध धर्माच्या मुळाशी जोडण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता, ज्याकडे ते तर्कसंगत आणि नैतिक विचार प्रणाली म्हणून पाहत होते.
बौद्ध धर्मात धर्मांतर (1956) : डॉ. आंबेडकरांनी 1956 मध्ये सार्वजनिकरित्या बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी पालीमध्ये त्रिशरण (तीन शरण) आणि पंचशील (पाच उपदेश) पाठ करून बौद्ध व्यवहारात भाषेचे महत्त्व पटवून दिले. Dr. Ambedkar and Pali Language
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाली भाषेतील योगदान
बाबासाहेबांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक प्रवास हा थक्क करणारा आहे. असमतेने जातीपातीत विभागलेल्या आणि कायम शोषित राहिलेल्या समाजाला स्वातंत्र्य, समतावादी व मानवमुक्ती आणि कल्याणाचा मार्ग असलेल्या बौध्द धम्माची दीक्षा त्यांनी दिली. मात्र केवळ दीक्षा देऊन बाबासाहेब थांबले नाही तर “द बुद्ध अँड हिज धम्म” आणि “पालि व्याकरण व शब्दकोश” सारखे दोन अद्वितीय ग्रंथ लिहिले ज्यामुळे बाबासाहेबांचे पाली भाषेबद्दलचे प्रेम, आदर आणि दूरदृष्टी दिसून येते. या संदर्भात बाबासाहेब लिहितात,”बौद्धधम्माच्या प्रसाराबद्दल लोकांमध्ये ज्या दिवसापासून आतुरता उत्पन्न झाली आहे त्या दिवसापासून बौद्धधम्म म्हणजे काय, व त्याचे वाङ्मय काय आहे, व कोठे काय मिळते यासंबंधाने भारतीय जनतेमध्ये अतिशय मोठे कुतूहल दिसून येते”. १९४० नंतर म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर बाबासाहेबांनी “पाली व्याकरण व शब्दकोश” लिहिला हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाने १९९८ साली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘समग्र लेखन आणि भाषणे’ या मालिकेतील १६ वा खंड म्हणून प्रकाशित केला आहे. Dr. Ambedkar and Pali Language
बाबासाहेबांच्या या ग्रंथाची तुलना, १७५५ मधे डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांच्या इंग्रजी शब्दकोशाशी केली जाते. मात्र त्यात एक मोठा फरक आहे. डॉ.जॉन्सनने जेव्हा इंग्रजीचा शब्दकोश लिहिला तेव्हा इंग्रजी ही जागतिक भाषा होऊ पाहत होती तर बाबासाहेबांनी जेव्हा पाली शब्दकोश लिहिला तेव्हा पालि जवळपास एक मृत भाषा होती. आणि मृत भाषा प्रवाहात नसल्यामुळे त्यातील वेगवेगळे शब्द शोधून, त्यांचे अर्थ व वाक्यरचना करणे हे महाकठीण काम बाबासाहेबांनी केले. या ग्रंथाचे चार प्रमुख भाग असून पहिल्या भागात, पाली – इंग्रजी शब्दकोश आहे, दुसऱ्या भागात पालि-मराठी-इंग्रजी-गुजराथी आणि हिंदी या भाषांचा विस्तारित शब्दकोश आहे तर तिसऱ्या भागात पाली व्याकरण आणि चौथ्या भागात बौद्ध पूजापाठ आहे. एवढंच नव्हे तर पाली भाषेतील वाक्यरचना कशी करावी व दोन व्यक्तींमधील घरगुती अथवा व्यावसायिक संवाद पालीमधे कसा असावा हेही बाबासाहेबांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे हा शब्दकोश जगातल्या इतर सर्व शब्दकोशांपेक्षा वेगळा ठरतो. Dr. Ambedkar and Pali Language
पालिभाषेचे व्याकरण लिहीत असताना बाबासाहेबांना प्रचंड अभ्यास करावा लागला. या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून, त्याची अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी करून, सर्वसामान्यांना देखील समजेल असे व्याकरण आणि त्याची वाक्यरचना असे विलक्षण काम बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात केले आहे. त्यामुळे पाली भाषा व तिचे व्याकरण शिकताना सोयीचे जाते. भविष्यात भारतात बौध्द धम्माचे आकर्षण वाढेल आणि बुध्दविचार समजून घेण्यासाठी लोक पाली भाषा शिकतील हा दूरदृष्टीपणा ठेऊन बाबासाहेबांनी पालि शब्दकोश व व्याकरण हा ग्रंथ लिहिला जो आजही पाली भाषा शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. “द बुद्ध अँड हिस धम्म” हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांना संपूर्ण त्रिपिटक आणि इतर बौद्ध ग्रंथ वाचावे लागले. त्यावेळेस, त्यांनीच लिहिलेल्या पाली व्याकरण व शब्दकोश या ग्रंथाचा उपयोग त्यांना झाला. Dr. Ambedkar and Pali Language
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदे मिळतात
.पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता पालीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्यादृष्टीने चालना मिळणार.
.यामुळे आता भारतातील सर्व 450 विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते.
.पालीतील प्राचीन ग्रंथांचे अनुवादन केले जाईल.
.राज्यातील 12 हजार ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्यानंतर या सर्व ग्रंथालयांचे सशक्तीकरण होईल.
.अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हे पुरस्कार पाली भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल.
.पाली भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळेल.
.पाली भाषेच्या उत्कर्षासाठी त्याच्या संवर्धानासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळू शकेल.
.प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
.अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल. Dr. Ambedkar and Pali Language