रत्नागिरी, ता. 05 : दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, असे परंपरा मानते. गीताजयंती निमित्त येत्या बुधवारी (ता. ११ डिसेंबर) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि रत्नागिरीतील गीताप्रेमींनी रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात कार्यक्रम आयोजित केला आहे. यात संपूर्ण गीतापठण कार्यक्रम आणि प्रसिद्ध प्रवचनकार श्री.धनंजय चितळे यांचे व्याख्यान होणार आहे. Lecture on Gita Jayanti in Ratnagiri
शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात दुपारी २ वाजता गीतापठण सुरू होणार आहे. यात रत्नागिरीतील नित्य गीतापठण करणारे गीताप्रेमी तसेच विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. गीता पठणासाठी दु. १.४५ वाजता गीतेचे पुस्तक घेऊन उपस्थित राहावे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता प्रवचनकार धनंजय चितळे हे ‘श्रीमद्भगवद्गीता महती आणि गीतेचे अभ्यासक’ यावर व्याख्यान देणार आहेत. Lecture on Gita Jayanti in Ratnagiri
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रा. भा. शिर्के प्रशाला, गोदूताई जांभेकर विद्यालय, जीजीपीएस, एस. वाय. गोडबोले विद्यामंदिर, पटवर्धन हायस्कूल, फाटक प्रशाला तसेच अन्य शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक, गीताप्रेमींनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी केले आहे. Lecture on Gita Jayanti in Ratnagiri