रत्नागिरी, ता. 04 : शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा संत गोरा कुंभार सभागृह खेर्डी-चिपळूण येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार, जिल्हा सेवा संघ रत्नागिरीचे पदाधिकारी व रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवाआघाडी यांची संयुक्त सभा पार पडली. यावेळी कुंभार समाजाच्या विकासाच्या, संघटनेच्या दृष्टीने पुरक विषय तसेच संघटन वाढीसाठी आवश्यक उपक्रम व सामाजिक सेवेसाठी काही उपक्रम यावर चर्चा झाली. Discussion about useful activities by potters society
यामध्ये समाजातील यशस्वी व्यावसायीक व त्यांची यशोगाथा यातून नविन तरूणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी व्यावसायिक स्नेहसंमेलन हा महत्वाची उपक्रमासंदर्भात चर्चा झाली. त्याच बरोबर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर ह्यांवर चर्चा करण्यात आली व समाजातील संपूर्ण जिल्ह्यातील तरुण एकत्र येवून संघटन बांधनी व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा मर्यादित KPL क्रिकेट स्पर्धा नियोजन यावर विचारविनीमय करण्यात आले. डिसेंबर महिन्यात प्रत्येक तालुक्यामध्ये गावभेट दौरा करून त्या ठिकाणी समाजबांधव पदाधिकाऱ्यांजवळ या व्यावसायीक स्नेहसंमेलन व इतर उपक्रम आणि KPL यावर चर्चा करण्यात येणार आहे असे या सभेमध्ये ठरले. यासाठी सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Discussion about useful activities by potters society
या सभेवेळी संत शिरोमणी गोरोबा कुंभार, सेवा संघ रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष गुडेकर, व जिल्हा सचिव श्री. प्रकाश साळवी, जिल्हा सोशल मिडीया अध्यक्ष रविंद्र शिरकर, संघटक श्री. नाना पालकर व श्री निलेश कुंभार त्याच प्रमाणे कोकण कुंभार समाज युवाआघाडी उपाध्यक्ष श्री.प्रदिपजी शिरकर, युवक जिल्हाध्यक्ष श्री. महेशजी पडवेकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. योगेशजी गुहागरकर, जिल्हा सचिव श्री सुधीरजी जामसुतकर, सभासद श्री.प्रशातजी साळवी व युवक तालुकाध्यक्ष श्री. दिनेशजी वहाळकर आदि पदीधिकारी उपस्थित होते. Discussion about useful activities by potters society