गुहागर, ता. 04 : तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली येथे जागतिक साक्षरता दिनानिमित्त खोडदे नं. १ या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे समवेत विद्यार्थांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी आजच्या जागतिकीकरणात सर्वात महत्वाची भूमिका हि संगणकाचीच आहे. यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक श्री. संदेश साळवी यांनी संगणकाविषयी विस्तृत माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमाद्वारे दाखवून विद्यार्थ्यांकडून संगणक प्रात्यक्षिक सराव करून घेण्यात आला. Literacy Day at Suyash Computers
यावेळी जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिता गावंडे, सहशिक्षिका सौ. संध्या पाटील यांनी सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली या सेंटरच्या सर्व टिमला धन्यवाद दिले. यावेळी सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोलीचे संचालक श्री. संदेश साळवी, संचालिका सौ. सावी साळवी, कर्मचारी शुभम सावंत, साक्षी सावंत, प्राजक्ता पवार, सिद्धी डिंगणकर यांचेसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. Literacy Day at Suyash Computers