जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, ता. 02 : लोकशाही दिनात आलेले अर्ज ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, ते तात्काळ निकाली काढावेत, त्याबाबत केलेल्या कृती अहवालाची माहिती शुक्रवारपर्यंत द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या लोकशाही कार्यक्रमात पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमूख उपस्थित होते. Pending applications from Democracy Day
उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे यांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांची माहिती दिली. त्यानंतर लोकशाही दिनात प्राप्त अर्जांची माहिती दिली. संबंधित विभागाने प्राप्त अर्जांवर केलेला कृती अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. Pending applications from Democracy Day
सेवा हक्क कायदा अंतर्गत अर्ज वेळेवर निपटारा करा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सेवा हक्क कायदा 2015 अंतर्गत प्रलंबित असणाऱ्या अर्जांचा निपटारा वेळेवर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिल्या. लोकशाही दिनानंतर याबाबत बैठक झाली. उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. प्रलंबित प्रकरणे असणाऱ्या विभाग प्रमुखांना पत्र पाठवा. तसेच, अपिलीय निकाली काढावीत, असेही ते म्हणाले. Pending applications from Democracy Day