संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रास्ताविका शपथ ग्रहण करण्यात आली. Constitution Day celebrated at Khodde
यावेळी प्रभारी सरपंच कुमारी पूजा गुरव, सदस्य सौ तनुजा पवार , सौ शुभांगी डिंगणकर , सामाजिक कार्यकर्ते श्री विलास गुरव, श्री शरद साळवी, पोलीस पाटील सौ.योगिता पवार, संत गाडगेबाबा अध्यक्ष श्री.राजेंद्र साळवी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.राजेश पवार, ग्रामपंचायत अधिकारी श्री.बाबूराव सूर्यवंशी, आशा सेविका सौ. मधुरा साळवी, श्री. दत्ताराम डिंगणकर, श्रीम. इंदिरा साळवी, कर्मचारी श्री. नितीन मोहिते, श्री. वैभव निवाते, कु. पूनम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. Constitution Day celebrated at Khodde