गुहागर, ता. 29 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Velneshwar College) येथे दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी उद्योजकता विकास या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकासात तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची पद्धत, सर्जनशील विचार आणि निर्णयक्षमता वाढवणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता. Workshop at Velneshwar College
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मूनी लूप्सचे संस्थापक तसेच महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी, युवा उद्योजिका स्मृती चव्हाण यांनी ऑनलाईन पद्धतीने हे सत्र घेतले. त्यांनी उद्योजकता विकासातील समस्या सोडवण्यासाठी विविध पद्धती आणि नवीन कल्पना शोधण्याचे प्रभावी तंत्र याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या उद्योग प्रवासाबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित केले. Workshop at Velneshwar College
या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून कॉम्प्युटर विभागाच्या प्रा.राधिका कदम व प्रा.कृष्णा मालठाणकर यांनी काम पाहिले. तसेच महाविद्यालयाचे कॉम्प्युटर विभागाचे विभागप्रमुख प्रा. केतन कुंडीया ,उपप्राचार्य अविनाश पवार आणि प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली. Workshop at Velneshwar College