बँकिंग पॉईंटमधील घटना, 25 हजार न देताच आरोपीचे पलायन
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील शृंगारतळी येथे स्टार इलेक्ट्रीकल्स आणि मनी ट्रान्सफर या दुकानाचे मालक आजिम साल्हे यांची 25 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. 19 नोव्हेबरला झालेल्या फसवणुकीबाबत दुकान मालक आजिम साल्हे यांनी 24 नोव्हेंबरला गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पैसे पाठविण्याच्या बहाण्याने आलेल्या गणेश उगलमुगले यांने सांगितलेल्या खात्यात आजिम साल्हे यांनी पैसे पाठविले. मात्र साल्हेंनी पाठवलेले पैसे रोख स्वरुपात देण्याची वेळ आली तेव्हा गणेश उगलमुगले नामक व्यक्तीने तेथून दुचाकीने पलायन केले. Fraud on the pretext of sending money
शृंगारतळी येथे आजिम दाऊद साल्हे (वय 35) स्टार इलेक्ट्रीकल मनी ट्रान्सफर नावाचे दुकान आहे. दुकानात साल्हे मोबाईल तसेच इलेक्ट्रीकल्स वस्तुंची विक्री व दुरुस्ती करतात. सन 2014 पासून याच दुकानात त्यांनी अधिकृत बँकिंग पॉईंन्ट सुरु केला. या बँकिंग पाँईंन्ट द्वारे ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात जमा करुन देण्याची सेवा दिली जाते. त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकाने त्यांना 25 हजार रुपयांना फसविले. याबाबत पोलीस ठाण्यात त्यांनी 24 नोव्हेबर रोजी तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे 19 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.45 च्या सुमारास दुचाकीवरुन गणेश उगलमुगले दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडील रोख रु. 25 हजार ओव्हरसीज बँक खाते 320001000002987 या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. Fraud on the pretext of sending money
मात्र पैसे पाठविण्यासाठी मी वापरत असलेल्या इंडियन एअरटेल ऑडीट मनी पेमेन्ट या वॅलेटमध्ये पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मी माझे वैयक्तिक खाते असलेल्या कॅनरा बँकेतून हे पैसे ट्रान्सफर करण्याचे निश्चित केले. मनी ट्रान्सफरसाठी गणेश उगलमुगले यांना मोबाईल क्रमांक विचारला त्यावेळी त्यांनी 9112671644 आणि 8983489409 हे दोन क्रमांक दिले. गणेश उगलमुगले यांनी सांगितलेल्या ओव्हरसीज बँकेत माझ्या कॅनरा बँकेच्या खात्यातून सुरवातील 1 रु आणि नंतर 24 हजार 999 रु. ट्रान्सफर केले. आता गणेश उगलमुगले यांच्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दुचाकीला लावलेल्या पिशवीतील पैसे आणून देतो असे सांगुन गणेश दुचाकीजवळ गेला. दोन मिनिटे दुचाकीला लावलेली पिशवी चाचपडून त्यातील पैसे शोधु लागला. त्याचवेळी दुचाकी सुरु करुन गुहागरच्या दिशेने गणेशने पलायन केले. हे लक्षात आल्यावर मी तातडीने दुकान बंद करुन त्याचा पाठलाग केला. मात्र तो मला सापडला नाही. ही तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून उपनिरीक्षक संदिप भोपाले अधिक तपास करीत आहेत. Fraud on the pretext of sending money