• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जाती – पातीचं राजकारण कधी केलं नाही

by Guhagar News
November 18, 2024
in Politics
235 2
0
Public meeting of MLA Jadhav at Patpanhale
461
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी चक्रव्यूह भेदणार; आ. भास्कर जाधव

गुहागर, ता. 18 : होय, मी महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, उध्दव साहेबांसाठी लढतोय. महाराष्ट्रभर फिरतोय. त्याला कारणही तसेच आहे. ज्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना २२ जून २०२२ रोजी गद्दारांनी मुख्यमंत्रीपदावरून खाली ओढलं, तो क्षण मी बघितला आहे. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. उद्धव साहेबांचं मोठं ऑपरेशन झालं होतं. कोरोनाचे संकट असल्यामुळे ते वारंवार हे ऑपरेशन पुढे ढकलत होते. ऑपरेशननंतर ८० तास अंगावर बसलेली साधी माशीही त्यांना समजत नव्हते. अशावेळी विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते. आता हा माणूस पुन्हा उठणार नाही. मुख्यमंत्री उठला नाही, तर सरकार गडगडेल, असं त्यांना वाटलं होतं. आई जगदंबेच्या कृपेने आणि माँसाहेब बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे उध्दवसाहेब पुन्हा सावरू लागले, चालू लागले. त्यामुळे गद्दारांची इच्छा धुळीला मिळाली. म्हणून त्यांनी उद्धव साहेबांच्या आजारपणाची संधी साधत गद्दारी केली. त्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. मी महाराष्ट्र भर फिरतोय. भाजपला अंगावर घेतलंय. मिध्यांना अंगावर घेतले. अजित पवारांशी सुद्धा दोन हात केल्याशिवाय मी राहाणार नाही, मात्र यामुळे माझ्या मतदार संघात विरोधकांनी मला घेरण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र या चक्रव्यूहातून बाहेर पडून दाखवीन, तरच माझं नाव भास्कर जाधव, अशी गर्जना महाविकास आघाडीचे गुहागर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, माजी मंत्री, आमदार भास्करशेठ जाधव यांनी केले. Public meeting of MLA Jadhav at Patpanhale

पाटपन्हाळे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला सौ. सुवर्णाताई जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, विभावरी मुळे, प्रवीण ओक, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, सीताराम ठोंबरे, सुनिल पवार, विलास वाघे, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक मोहन मिरगल, शब्बीर साल्हे, माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, स्नेहा भागडे, विनायक मुळे, काशिनाथ मोहिते, जयदेव मोरे, इम्रान घारे, समित घाणेकर, संजय पवार आदी उपस्थित होते. Public meeting of MLA Jadhav at Patpanhale

Public meeting of MLA Jadhav at Patpanhale

डॉ. नातूंनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाडले

आमदार भास्करशेठ जाधव म्हणाले, माझा सुपुत्र, जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी चांगले भाषण केले आहे. कुठल्या मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला नाही, असे नाही. २० तारखेला भास्करशेठ जाधव यांना का निवडून द्यावं, असे मुद्देसूद भाषण त्यांने केले. २४ तारखेला मी उमेदवारी अर्ज भरताना भरला. डॉ. विनय नातू यापूर्वी शिवसेनेच्या बळावरच आमदार झाले. परंतु २००९ च्या निवडणुकीत त्यांनी खोडा घातला आणि शिवसेनेच्या रामदास कदम यांना पाडले. डॉ. नातूंच्या मनात पाप आहे. ते जाती- पातीचे राजकारण करतात. रवींद्र चव्हाण यांच्या पैशातून त्यांनी महिलांना निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. राजेश बेंडल हे कुणबी समाजाकडून, नंतर बळीराज सेनेकडून निवडणूक लढविणार असे सांगितले जात होते. खा. सुनिल तटकरे यांनाही भेटले होते, मात्र अचानक ते मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतून निवडणूक लढवत आहेत. Public meeting of MLA Jadhav at Patpanhale

राजेश बेंडल कामाचा माणूस नाही; पुन्हा ते माझ्यासोबतच येतील

राजेश बेंडल यांच्याविषयी फार बोलण्यासारखे नाही, तो बिनकामाचा माणूस आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. गद्दारांनी आम्हाला शिकवू नये. नवाब मलिक, देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकले गेले. त्याचे समर्थन कोणीही करणार नाही. राजेश बेंडल हे सभापती होते, नगराध्यक्ष होते, मात्र एकही दिसेल असं काम त्यांनी केलं नाही, ते आमदार होऊन तुमचा काय विकास करणार, असा सवालही त्यांनी विचारला. कुणबी समाजाचे नेते रामचंद्र हुमणे, कृष्णा वणे हे समाजासमाजामध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहेत, मात्र मी आपल्याच समाजाला पुढे आणतो, असा आरोप करतात. मात्र मी बहुजन समाजातील नगराध्यक्ष केला, पंचायत समिती सभापती, उपसभापती केले. मी सर्वांना समान संधी देत आलो आहे. मी कधीही कुणाला डावललं नाही. जाती-पातीचे राजकारण भास्कर जाधव याने कधी आपल्या आयुष्यात केलं नाही, असेही त्यांनी सांगितले. रामचंद्र हुमणे, कृष्णा वणे यांच्या नादाला लागण्यापेक्षा राजेश बेंडल यांनी त्यांच्या आहारी जाऊ नये, उद्या राजेश बेंडल हे माझ्याकडेच येणार आहेत. आजवर जे जे माझे विरोधात गेले, माझ्याविरुद्ध लढले, ते सगळे माझ्याकडेच आले आहेत. सहदेव बेटकर हेही माझ्या विरोधात लढले. मात्र आज ते माझ्यासोबत आहेत. Public meeting of MLA Jadhav at Patpanhale

मतदार संघ न बघता राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, दापोली अशा ठिकाणी मी प्रचार केला. कोल्हापूर, हिंगोली, ठाणे या ठिकाणी गेलो. उद्या महाडला जात आहे. माझ्या मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात सभा व्हावी, अशी विक्रांत जाधव याची इच्छा होती. तो मला सातत्याने बेसावध राहू नका, असं सांगत होता. त्यामुळे सर्व गटातील सभा झाल्या आणि आज पाटपन्हाळे आणि शृंगारतळीची सभा होत आहे, असे सांगताना मतदारांचे प्रेम, या सभेचे साक्षात विराट रूप पाहाताना मला आनंद होतोय, असेही ते म्हणाले. Public meeting of MLA Jadhav at Patpanhale

आमदार भास्करशेठ जाधव यांनी अत्यंत आक्रमकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या सभेचा समाचार घेतला. मी सतत सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी झालो. जाती-पातीचे राजकारण कधीही केलं नाही. निवडणूक आज आहे आणि उद्या संपेल, मात्र निवडणूक संपल्यानंतरही मी तुमच्यासोबत असेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुहागरमधील भाकरी परतायला हवी, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर बोलताना आमदार भास्करशेठ जाधव म्हणाले, हे माझ्यासाठी नव्हते. मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेतलेलं नाही, हे सारं डॉ. विनय नातू यांच्यासाठी ते बोलले. यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या विरोधात गद्दारी केली होती. ते त्यांना उद्देशून होतं. आडीत कुजलेला आंबा बाजूला करा, असेही मुख्यमंत्री डॉ. विनय नातू यांच्या संदर्भातच बोलले, असा खुलासाही आमदार भास्करशेठ जाधव यांनी केला. Public meeting of MLA Jadhav at Patpanhale

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPublic meeting of MLA Jadhav at PatpanhaleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share184SendTweet115
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.