संवर्धन मोहिमेचे यश; एकूण 117 अंडी संरक्षित; हंगामाला सुरुवात
गुहागर, ता. 16 : येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रीडले प्रजातीच्या कासवाचे पहिले घरटे सापडले. वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घरट्यातील 117 अंडी संरक्षित केली आहेत. नव्या हंगामातील राज्यातील पहिले घरटे मिळणारा गुहागर हा या वर्षीचा पहिला समुद्र किनारा आहे. Guhagar Turtle Conservation campaign
गुहागर बाग परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी (ता. 15) कासव मित्र फिरत होते. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालून गेलेल्या कासवाच्या पाऊलखुणा त्यांना दिसल्या. या खुणांचा मागवा घेतल्यावर कासव मित्रांना घरटे सापडले. तातडीने कासव मित्र तोडणकर यांनी वनपाल अमित निमकर यांना बोलावले. त्यानंतर कासव मित्र तोडणकर, बागकर, भोसले, वनपाल निमकर आणि वनरक्षक गायकवाड यांच्या उपस्थितीत कासवाचे घरटे उपसून मार्गदर्शक सूचनांनुसार त्यातील अंडी बाहेर काढण्यात आली. Guhagar Turtle Conservation campaign
ऑलिव्ह रीडले प्रजातीची मादी कासव साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारी येतात. गेली दोन वर्ष सातत्याने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक कासवे अंडी घालण्यासाठी आली. मात्र गेली दोन वर्षे कासवांची अंडी मिळण्याचा कालावधी जानेवारीपर्यंत लांबला होता. Guhagar Turtle Conservation campaign
या पार्श्वभूमीवर गुहागरला नोव्हेंबर महिन्यात अंडी मिळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. दरम्यान गतवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्र किनारी कासवांचे पहिले घरटे आढळले होते. यंदा पाऊस उशिरापर्यंत होता आणि थंडी पडण्यास विलंब झाल्यामुळे कासवांचा अंडी घालण्याचा हंगाम लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतू गुहागरमध्ये राज्यातील पहिले घरटे सापडल्याने गेल्या दोन दोन वर्ष सातत्याने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक कासवे अंडी घालण्यासाठी येतील का अशी उत्सूकता सर्वांना लागली आहे. Guhagar Turtle Conservation campaign
कासव संवर्धन मोहिमेत अधिक सुसुत्रता यावी म्हणून कांदळवन कक्षाला अधिक स्वायत्तता आणि मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. त्यामुळे कांदळवन कक्षतर्फे कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर अधिकारी, कासव मोहिमेचा अनुभव असलेले प्रशिक्षक, तंत्रज्ञ यांचीही नियुक्ती केली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून परिक्षेत्र वन अधिकारी कांदळवन कक्ष म्हणून किरण ठाकूर हे आता कासव संवर्धन मोहिमेला अधिक व्यापक करणार आहेत. Guhagar Turtle Conservation campaign