• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत येथील नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सांगता

by Ganesh Dhanawade
November 14, 2024
in Guhagar
163 2
0
Training of newly appointed teachers is complete
321
SHARES
917
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : आर पी पालशेतकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालशेत येथे 4 नोव्हेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 अखेर गुहागर तालुक्यातील नवनियुक्त शिक्षकांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचे ज्येष्ठ अधिव्याख्याता राहुल बर्वे साहेब यांनी प्रशिक्षणा दरम्यान भेट देऊन शाळेतील गुणवत्ता उंचाविण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. Training of newly appointed teachers is complete

सदर प्रशिक्षणाचे केंद्र संचालक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून दशरथ कदम, मनोज पाटील, नरेंद्र देवळेकर, प्रताप देसले, रवींद्र कुळे, दिनेश जागकर आदीने काम पाहिले. त्यावेळी गुहागर तालुक्यातील सर्व नवनियुक्त शिक्षकांना  सदर प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना वैश्विक नागरिक घडविण्यासाठी तसेच भारताला जागतिक ज्ञानसत्ता बनविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, शैक्षणिक साहित्य निर्मिती, अध्ययन अध्यापन पद्धती, बालकांचा सत्तेचा व मोफत शिक्षणाचा अधिकार 2009, तणावाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व व प्रशासन, शैक्षणिक साहित्यनिर्मिती, निपुण भारत, शैक्षणिक वातावरण कार्यपद्धती, कला क्रीडा कथाकथन व अनुभव आधारित अध्यापन, मूल्यमापनाच्या नवीन पद्धतीची ओळख, शिक्षण विषयक कायदे व राष्ट्रीय धोरण 2020, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, भविष्य वेधी शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व तांत्रिक कौशल्य, शालेय स्पर्धा परीक्षा, शिक्षक व विकसन व्यवस्थापन, शालेय स्तरावरील समित्या, विविध व्यासपीठ शिक्षण संस्था व संदर्भ साहित्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. Training of newly appointed teachers is complete

प्रशिक्षणा दरम्यान श्री. सतेश पाटील यांनी वारली चित्रकलेतून रांगोळी साकारून मतदार जनजागृती केली तसेच विविध रांगोळी काढण्यामध्ये अर्चना वाकडे, तेजस्विनी जगताप, वेदांती कटनाक, अफसाना मुल्ला, सुषमा गायकवाड, धन्वंतरी मोरे, आरती अलीमोरे, पूजा मेत्रे, रूपाली पाथरे इत्यादी प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग होता. सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या योगदानातून स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. सांगता कार्यक्रमाच्या वेळी प्रशिक्षणार्थी विजय आखाडे, नितेश मोरे, वैद्य मॅडम, प्रदीप पाटील, तुषार लोहार यांनी मनोगत व्यक्त करताना सदर प्रशिक्षणामध्ये आम्हाला खूपच उपयुक्त असे मार्गदर्शन मिळाले असून अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिकच गतिमान होणार आहे. त्यासाठी आम्हाला योग्य दिशा मिळालेली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रशिक्षणार्थी विनोद कदम यांच्या संकल्पनेतून शिक्षण विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर, केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, विषय शिक्षक साखरे सर तसेच सर्व तज्ञ मार्गदर्शक यांचा फेटे बांधून व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. Training of newly appointed teachers is complete

सदर कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर, केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, पंचायत समिती विषय शिक्षक साखरे सर, सर्व तज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तज्ञ मार्गदर्शक मनोज पाटील यांनी केले. प्रशिक्षणामध्ये विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी, सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. Training of newly appointed teachers is complete

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTraining of newly appointed teachers is completeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.