नीलेश सुर्वे, भाजप महायुतीच्या प्रचारातून बाहेर
गुहागर, ता. 13 : रामदास कदमांच्या मनात वेगळेच सुरु आहे. जाणूनबुजून ही वक्तव्ये सुरु आहेत. वादग्रस्त, बेताल वक्तव्ये करुन महायुतीच्या प्रचारात खीळ घालण्याचे काम रामदास कदम यांनी केले आहे. आता त्यांनी किंवा शिवसेनेच्या वरिष्ठांनी यांच्याकडून खुलासा होत नाही तोवर भाजप प्रचारात उतरणार नाही. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात याचे गंभीर परिणाम महायुतीला भोगावे लागले तर त्याची पूर्ण जबाबदारी रामदास कदम यांची असेल. असा इशाराच निलेश सुर्वे यांनी दिला आहे. ते शृंगारतळी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. Ramdas Kadam is damaging the Mahayutti
एका सामाजिक माध्यमाला मुलाखत देताना रामदास कदम यांनी मंगळवारी (ता. 12) डॉ. विनय नातुंबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे उत्तर रत्नागिरीतील भाजप कार्यकर्त्यांनी संतापून प्रचार थांबविला. यासंदर्भात आज भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना सुर्वे म्हणाले की, स्व. तात्या नातूंनी भाजप इथे रुजविला. डॉ. विनय नातूंनी हा पक्ष वाढवला. जर विधानसभा लढविणे हा डॉ. नातुंचा छंद असेल तर विधानसभा हरल्यावर विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धंदा आहे का. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. रामदास कदम अनुभवाने आणि वयाने मोठे आहेत. मात्र त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे वाटते. कदम कुटुंबाने आणि शिवसेनेने त्यांना नजरकैदेत ठेवावे आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करुन घेणे गरजचे वाटु लागले आहे. Ramdas Kadam is damaging the Mahayutti
2009 पासून 16 वर्ष डॉ. विनय नातू आमदार होते. 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यावेळी गुहागरच्या आधीच्या विधानसभा मतदारसंघातील 70 टक्के भाग तसाच राहीला आणि उर्वरीत भाग खेड तालुक्यातील जोडला गेला. अशा स्थितीत हा विधानसभा मतदारसंघ जागावाटपात भाजपकडे येणे स्वाभाविक होते. रामदास कदम यांना पुनर्रचनेनंतर सर्वाधिक जवळचा मतदारसंघ दापोलीचा होता. तो शिवसेनेकडे होता. मग बाळासाहेबांनी आणि शिवसेनेने तो मतदारसंघ त्यांना का दिला नाही. याचा अर्थ त्याकाळी शिवसेनाप्रमुखांना रामदास कदम यांच्याहून सुर्यकांत दळवी जवळचे होते. असे म्हटले तर चूक आहे का. त्या निवडणुकीत तुमचा पराभव विनय नातुंनी, वैभव खेडेकर, भास्कर जाधव यांनी केला की तुमच्या कर्माने केला. याचे स्पष्ट उत्तर रामदासभाईंनी द्यावे. त्यांच्या मनात संघ आणि भाजप द्वेष ठासून भरला आहे. तो खेडमध्ये, गुहागरमध्ये दिसतो. 2009 मध्ये रामदास कदम गुहागरमधुन जिंकले असते तर इथली भाजप संपवली असती. आज दापोलीतील भाजप काय सहन करत्येत ते एकदा लोकांसमोर आले पाहीजे. दापोली तालुक्याचा भाजप तालुकाध्यक्ष सध्या ठार मारले जाईल या भयगंडाने त्रस्त आहे. Ramdas Kadam is damaging the Mahayutti
पालवणच्या सभेत 16 वर्ष आमदार असलेल्या डॉ. नातूंना भर सभेत थांबवता. लोकसभा निवडणुकीतील तटकरेंच्या प्रचार सभेत प्रत्येकवेळी विधानसभा निवडणुकीचा विषय काढता. हा मतदारसंघ मी दत्तक घेतला सांगता. ही तुमची राजकीय संस्कृती असेल तर त्याच निवडणुकीत दापोली मतदारसंघात काय झाले. मताधिक्य दिले नाही तर योगेश कदम आमदारकीचा राजीनामा देणार होते. त्याचे काय झाले. इथे 6 आमदार कुणबी समाजाचे होते हे तुम्हीच सांगता. मग गेल्या 25 वर्षात खेडमध्ये तुम्ही का कुणबी समाजाचा उमेदवार दिला नाही. तुम्ही गुहागरची विधानसभा दत्तक घेणार होतात मग 2009 नंतर तुम्ही कुठे होतात. 2014, 2019 च्या निवडणुकीत (Election 2024) तुम्ही कुणबी समाजाचा उमेदवार का दिला नाहीत. 2019 मध्ये सहदेव बेटकर यांना Shivsena BJP युतीतून उमेदवारीचा शब्द रामदास कदम यांनी दिला होता. आणि त्यानंतर उमेदवारी नाकारणारेही तेच होते. यांना कुठल्याही समाजाबद्दल प्रेम नाहीए तर कुटुंब महत्त्वाचे आहे. केवळ गुहागरमध्येच एखाद्या समाजाला पुढे करुन आपलं राजकारण साधुन घेण्याचा उद्योग आहे. उद्या राजेश बेंडल यांचा पराभव झाला की इथेही तुमच्या दुसऱ्या मुलाला आमदार करायचे आहे. म्हणूनच तुमचा विपुल कदम, शशिकांत चव्हाण यांनाही विरोध आहे. Ramdas Kadam is damaging the Mahayutti
राजेश बेंडल यांना आमचा विरोध कधीच नव्हता. उलट गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वेळी डॉ. नातुंनी राजेश बेंडल यांना भाजपत आल्यास पुढचे आमदार तुम्हीच असाल असा शब्द 2017 मध्येच दिला होता. मात्र ते भाजपमध्ये आले नाहीत. आज महायुती म्हणून त्यांना उमेदवारी कार्यसम्राट पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. मात्र Rajesh Bendal यांना उमेदवारी दिल्याचे हे सांगतात मग उमेदवारी अर्ज भरण्यापासून, प्रचारसभा आणि बैठकांमधुन का दिसला नाहीत. यावेळीही आमचा विरोध राजेश बेंडल यांना नव्हता. तर आमच्या पक्षांतर्गत नाराजी होती. ती दूर झाल्यावर गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रचारात भाजप मोठा भाऊ म्हणून प्रचारात उतरला. Mahayuti विजयाच्या जवळ जाऊ लागली. सगळं सुरळीत सुरु असलेले रामदास कदमांना रुचले नाही. म्हणूनच त्यांनी डॉ. विनय नातुंवर टीका करुन मिठाचा खडा टाकला. रामदास कदम यांनी जाणुनबुजुन वक्तव्य केले आहे. 2019 च्या निवडणुकीत भास्कर जाधव मेरे साथ है अशी त्यांची भाषा होती. आजही तसेच नाही ना. हे नेते ओबीसी समाजाचा विश्र्वासघात तर करत नाहीत ना अशी शंका आम्हाला वाटु लागली आहे. असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी केले. Ramdas Kadam is damaging the Mahayutti