• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबई तवसाळ बस उशिरा सुटल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल

by Guhagar News
November 7, 2024
in Guhagar
297 3
0
Students will benefit if the bus leaves late
584
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : गुहागर डेपो मधुन दुपारी ०१:३०  वाजता सुटणारी मुंबई तवसाळ ही एस. टी. गाडी आबलोली मध्ये दुपारी ०३ वाजता येते व सायंकाळी ०४ वाजता तवसाळ येथे पोहचते तरी या एस. टी. च्या वेळेत थोडा बदल करुन हि एस. टी. गुहागर मधूनच दुपारी ०२:३० वाजता सुटली तर आबलोली मध्ये सायंकाळी ०४ वाजेपर्यंत पोहचेल किंवा तवसाळ येथे हिच एस. टी. एक तास थांबते त्याऐवजी ०३ ते ०४ या वेळेत एक तास आबलोली येथे थांबून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेली तर त्यामुळे मासू, आवरे फाटा, जांभारी, सडेजांभारी, कुडली पडवे, तवसाळ या ग्रामिण भागातून आबलोली येथे शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या जवळ पास २५ ते ३० विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि शैक्षणिक नुकसान टळेल. Students will benefit if the bus leaves late

तालुक्यातील लोक शिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आबलोली येथे मासू, आवरे फाटा, जांभारी, सडेजांभारी, कुडली, पडवे, तवसाळ या मार्गावरून शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या २५ ते ३० विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेप्रमाणे सुट्टीचे दिवस सोडून सकाळी १०:१० वाजता शाळा भरते व सायंकाळी ०४:१० शाळा सुटते परंतू शाळा सुटल्यानंतर ब-याच विद्यार्थ्यांना वेळेत घरी जाण्यासाठी परतीचा प्रवास करताना गैरसोय होते. यात वेळ व पैसा खर्च होतो व शैक्षणिक नुकसान होते. या विद्यार्थ्यांना सायंकाळी ०६ ते ०६:३० पर्यंत आबलोली येथेच एस. टी. ची वाट बघत थांबावे लागते. यामध्ये विद्यार्थ्यांचा रोजचा साधारण दोन तास वेळ वाया जातो. Students will benefit if the bus leaves late

तरी विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी मुंबई – तवसाळ या गाडीची वेळ बदलून गुहागर मधून दुपारी ०२:३० वाजता सोडून आमच्या विद्यालयास सहकार्य करावे, असे  विनंती वजा लेखी पत्र गुहागर तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आबलोली यांचे मुख्याध्यापक श्री. डि.डि.गीरी यांचे सहिने देण्यात आले आहे. त्यामुळे आबलोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. Students will benefit if the bus leaves late

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarStudents will benefit if the bus leaves lateUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share234SendTweet146
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.