गणेश कदम; स्वत:ची उमेदवारी घेतली मागे
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : गेल्या लोकसभेला महायुतीला जरांगें फॅक्टर चांगलाच महागात पडल्याने विधानसभेला जरांगेंनी उमेदवार उभे करावे म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या महायुतीच्या मित्रपक्षांची घोर निराशा झाली आहे. याचं कारणही तसं आहे याबाबत पत्रकारांशी खुलासा केला आहे. Retreat of Jarange Patil
याबाबत डोंबिवली मधील जरांगे पाटील समर्थक उमेदवार गणेश कदम पत्रकारांशी खुलासा करताना म्हणाले की,त्याचं झालं असं, जरांगें पाटील यांनी उमेदवार उभे केले तर महायुतीवर विशेषता देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेल्या मराठा समाजाची मतं महाविकास आघाडी आणि मराठा उमेदवार यांच्यात विभागली जाऊन युतीचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून येण्याची शक्यता राजकीय अभ्यासक यांनी वर्तवल्याने लागलीच भाजपाने IT सेलच्या माध्यमातून जरांगें पाटील यांनी उमेदवार उभे करावे म्हणून मराठा समाजाला डिवचण्यास सुरुवात केली आणि त्यात त्यांना यशही आहे. Retreat of Jarange Patil
कोणी आव्हान केल्यावर लगेच स्वीकार करणारा समाज अशी ख्याती असल्याने समाजाने पाटील यांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला व पाटील यांनीही समाजाच्या भावना लक्षात घेऊन सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे फर्मान सोडून सर्व इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. Retreat of Jarange Patil
पण पुढे झालं असं जरांगें यांच्या प्रामाणिक आणि रोखठोक भूमिकेमुळे करोडो समाज एकत्र आला खरा पण त्यात संघटनात्मक बांधणी नसल्याने एकएका मतदारसंघातून 20/25 इच्छुक उमेदवार तयार झाले, आता एवढ्या लोकांची मनधरणी करून एका मतदार संघात एक उमेदवार देणं हे गणित किती किचकट आहे, शिवाय एका समाजाच्या मतांवर किती उमेदवार निवडून येणं शक्य आहे याचा गांभीर्याने विचार केल्यावर मोठ्या संघर्षातून एक झालेला करोडो मराठा समाज एकत्र राहावा म्हणून एकही उमेदवार उभा न करण्याचा धाडसी निर्णय जरांगें यांनी घेतला व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काही तास शिल्लक असताना सर्वांना अर्ज मागे घेण्यास सांगून जरांगेंनी भर दिवाळीत महायुतीवर जणू काही राजकीय बॉम्बच टाकल्याने सर्वांचं गणित कोलमंडलं. Retreat of Jarange Patil
माताभगिनींवर झालेला लाठीचार्ज, त्यांचं सांडलेलं रक्त, कारण नसताना पाटील यांच्यामागे लावलेली SIT, वाशीला दिलेलं आश्वासन, आंदोलकांवरील गुन्हे कायम ठेवणं यासर्वामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका बजावल्याने बीजेपीचा सुपडा साफ करण्यासाठी लढणं नाही तर पाडणं ही भूमिका योग्य असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेऊन पाटील यांच्यासोबत कायम असल्याचे मतं गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं आहे. Retreat of Jarange Patil