एक दिवा शहिंदासाठी उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
गुहागर, ता. 31 : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षीही शिवतेज फाऊंडेशन आणि समस्त गुहागरवासिय यांच्यावतीने दिपावलीच्या पुर्वसंध्येला म्हणजेच धनत्रयोदशी संध्याकाळी ७ वाजता गांधी चौक येथे एक दिवा शहिदांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. One light for Shahinda
टिव्ही किंवा वर्तमानपत्रात बातम्या पाहून केवळ हळहळ व्यक्त न करता आम्ही गूहागरवासीय, जवानांप्रती असलेली कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्यासाठी कोणतेही राजकीय व सामाजिक अभिनीवेश न बाळगता एकत्र येतो ही बाब गुहागरवासीयांनी प्रत्येक वर्षी कृतीतून दाखवून दिली आहे. या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रपरिवारासहित या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थिती लावली. या उपक्रमासाठी खास भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक प्रतापराव शिर्के आणि निलेश नाना पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी काही किस्से सांगून नागरिकांच्या अंगावर शहारे आणले. संपूर्ण गांधी चौक दिव्यांनी प्रकाशमान झाले होते. One light for Shahinda
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. संकेत साळवी, श्री. राजेंद्र आरेकर, श्री. निलेश गोयथळे, श्री. संतोष वरंडे, श्री. गणेश धनावडे, श्री. विकास मालप, श्री. सुहास सातार्डेकर, ॲड.श्री. अलंकार विखारे, श्री. मनोज बारटक्के, श्री. प्रभुनाथ देवळेकर, श्री. अंकुश विखारे, राहुल कनगुटकर, सौ. उमा बारटक्के, श्रीमती श्रद्धा घाडे, श्रीमती सारिका कनगुटकर, ॲड. सुप्रिया वाघधरे यांनी मेहनत घेतली. One light for Shahinda
या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस कॉन्स्टेबल श्री. चौगुले, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, खातू मसाले उद्योग समूहाचे शैलेंद्र खातू, शामकांत खातू, माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा वरंडे, गुहागर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष मनोज बावधनकर, सत्यवान घाडे, प्रजापती ब्रह्मकुमारी विश्व् विद्यालयाच्या सीमा बहेनजी, अर्चना बारटक्के, ज्ञानेश्वर झगडे, विवेक जोशी, श्री. भाटकर, संगम मोरे आदीसह नागरिक उपस्थित होते. One light for Shahinda