350 कोटींचे सवलत मुल्य महामंडळाला दिले
गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) त्यांचा पगार दिवाळीआधीच (ST employees Salary) देण्याचा निर्णय घेतला असून सरकारने त्यासाठी लागणारी रक्कम महामंडळाकडे वर्ग केली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचे सवलत मूल्य ३५० कोटी रुपये महामंडळाला प्रदान करण्यात आली आहे. Diwali will be sweet for ST employees
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर २०२४ महिन्यासाठी सवलतमूल्याची रक्कम देण्याची विनंती शासनाकडे केली होती. महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने या विनंतीला मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने एसटी महामंडळासाठी ३५० कोटी रुपयांची निधी मंजुरी देऊन दिवाळीपूर्वी ही रक्कम वितरित करण्याचे नियोजन केले आहे. या निधीमुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर सुविधांसाठी मदत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त या निधी वितरणासाठी प्राधिकृत करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी यांना ही रक्कम एसटी महामंडळास तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी वेतनाची हमी मिळणार आहे. Diwali will be sweet for ST employees
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होत असतो. यंदा सोमवारी २८ ऑक्टोबरला वसूबारस ते रविवारी ३ नोव्हेंबरला भाऊबीज यादरम्यान दिवाळी सण साजरा होणार आहे. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचा महामंडळाचा मानस आहे. यासाठी राज्य सरकारकडून लवकर निधी मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांची दिवाळीभेट देण्यात येते. यंदा ही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही महामंडळाने राज्य सरकारकडे केली होती. Diwali will be sweet for ST employees
शासनाने 350 कोटींचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळी पूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात दिवाळीच्या सुट्टीत प्रवासासाठी एसटी बसचा सर्वाधिक वापर होतो. दिवाळी सणाच्या गर्दीच्या हंगामात प्रवासीसंख्या वाढत असल्याने महामंडळाला चांगला महसूलही मिळतो. त्यासाठी सणासुदीला सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड व्हावी, यासाठी महामंडळाने आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. Diwali will be sweet for ST employees