गुहागर, ता. 23 : मंडणगड येथील मोबाईल मेडिकल युनिट मार्फत होणाऱ्या आरोग्य शिबिर मध्ये दिनांक १७/१०/२०२४ रोजी आदिवासी वाडी सावरी आणि शिगवण येथील अति जोखिम गरोदर माता आणि नवजात शिशु यांची तपासणी केली. मोबाईल मेडिकल युनिट मार्फत शिबिरामध्ये जनरल पेशंट तपासणी आणि रक्त नमुने घेण्यात आले. Mobile health team for tribal community
मोबाईल मेडिकल युनिट मार्फत मंडणगड येथील सर्व आदिवासी वाडी येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. सदर उपक्रम हे दि. ०१/१०/२०२४ रोजी पासून संपूर्ण मंडणगड तालुका मध्ये सुरू आहे आणि दर महिन्याला दोन वेळ हे पथक आदिवासी भागांमध्ये फिरून आरोग्य तपासणी तसेच लोकांमध्ये आरोग्य विषयी जनजागृती करणार आहे. ही योजना सुरु करण्यात साठी जिल्हा परिषद रत्नागिरी चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. किर्ती किरण पुजार साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. अनिरुद्ध आठल्ये साहेब, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीम.लता गुंजवटे मॅडम या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहेत. Mobile health team for tribal community
त्यावेळेस तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिषेक गावंडे सर, समुदाय आरोग्य अधिकारी आंबडवे डॉ.खान सर, आरोग्य पर्यवेक्षक खान सर, आरोग्य सेवक रविंद्र पारधी व मोबाइल मेडिकल युनिट ची संपूर्ण टीम उपस्थित होती. Mobile health team for tribal community