• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातून प्रमोद गांधी यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर

by Ganesh Dhanawade
October 22, 2024
in Politics
197 2
3
Pramod Gandhi announced candidature from MNS
386
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसे पदाधिकाऱ्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत केला जल्लोष

गुहागर, ता. 22 : गुहागरातून प्रमोद गांधी यांची गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून उमेदवारी जाहीर झाली असून शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयासमोर मनसे पदाधिकाऱ्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, सुनील मूकनाक, निलेश गमरे, सुजित गांधी, मनसे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे विवेक जानवळकर उपस्थित होते. Pramod Gandhi announced candidature from MNS

Pramod Gandhi announced candidature from MNS

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले की, समाजसेवेची आवड व विकासाचा पाया रचणाऱ्या प्रमोद गांधी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संपूर्ण गुहागर विधानसभा क्षेत्रामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेला चांगला प्रतिसाद लाभत असून गुहागर मध्ये परिवर्तन होण्याची वाट लोक पाहत आहेत. निवडणूक म्हटली की, आव्हाने येणारच परंतु आमच्या पाठी राजसाहेब ठाकरे असल्याने आम्हाला कुठल्याही प्रतिस्पर्ध्यकाचे आव्हान कठीण नाही. Pramod Gandhi announced candidature from MNS

विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. गुहागर विधानसभा मतदारसंघात नवनिर्माण करणे हाच आमचा प्रमुख ध्येय आहे. मतदारसंघाचा विकास, स्थानिक युवकांना रोजगार, उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी मनसे नेहमीच कटिबद्ध राहील, त्याचबरोबर येथील जनतेने प्रमोद गांधी यांना भरघोस मताने विजयी करून दिल्यास गुहागर विधानसभा क्षेत्राचा नवनिर्माण करण्याचे आश्वासन यावेळी दिले. मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांचे नाव नागरिकांच्या मनात व घराघरात पोहोचले आहे. त्यांनी स्वनिधितून केलेली विकास कामे, गोरगरीब, गरजू यांना केलेली मदत पाहता चांगल्या मताधिक्याने ते निवडून येतील अशी आशा आहे त्यांनी व्यक्त केली. आजपासूनच आम्ही घराघरात गावागावात मनसेचा प्रचार करण्याचे काम करणार आहोत. तसेच मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी हे असंख्य मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. Pramod Gandhi announced candidature from MNS

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPramod Gandhi announced candidature from MNSUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share154SendTweet97
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.