फडणवीस, बावनकुळेंचा गुहागरच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा
गुहागर, ता. 16 : गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आग्रही आहोत. चार दिवसांत याचा निर्णय आपल्याला समजेल. सर्वांनी गुहागर विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागा. अशा सूचना भाजपचे वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर रत्नागिरीतील कार्यकर्त्यांना दिल्या. Fadnavis insists on Guhagar’s seat
गेले वर्षभर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी भाजप कार्यकते; झटत होते. गुहागरची जागा भाजपलाच मिळणार हा विश्र्वास वरिष्ठांनी दिला होता. लोकसभेनंतर माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या उमेदवारीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शिक्कामोर्तब केला. मतदारसंघात कहो दिलसे नातू फिरसे या टॅगलाईनला धरुन प्रचाराला सुरवात झाली. सप्टेंबर महिन्यात विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद गटनिहाय खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांच्या तुडुंब गर्दीत पार पडला. उत्साही कार्यकर्ते वायुवेगाने भाजपचा प्रचार करत होते. Fadnavis insists on Guhagar’s seat
या उत्साहावर सर्वपित्री अमावास्येच्या आधी दोन दिवस पाणी फिरले. गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार अशी बातमी येवून धडकली. खासदार श्रीकांत चव्हाण यांच्या नात्यातील विपुल कदम यांचे नाव शिवसेनेचे म्हणून चर्चेत आले. त्यापाठोपाठ गुहागर विधानसभा क्षेत्रात विपुल कदम यांचा फोटो व नाव असलेले धर्मवीर -२ चे बॅनर झळकले. नवरात्र उत्सवात विपुल कदम यांनी मतदारसंघातील 3 प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचार स्वीच ऑफ झाला. Fadnavis insists on Guhagar’s seat
नवरात्र उत्सवातील सर्व दिवस अस्वस्थेत गेले. त्यानंतर दापोलीत भाजपचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील आले असताना त्यांच्या समवेत भाजपच्या गुहागरमधील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या नेतृत्त्वात भाजपचे गुहागरमधील मुख्य पदाधिकारी मुंबईत गेले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रसाद लाड आदींची भेट घेतली. गुहागरमधील पक्षाची स्थिती, कार्यकर्त्यांची मानसिकता समजून सांगितली. Fadnavis insists on Guhagar’s seat
त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांजवळ बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुहागर मतदारसंघ जागावाटपात भाजपला मिळण्यासांठी आम्ही आग्रही आहोत. पुढील चार दिवसात आपल्यापर्यंत निर्णय पोचेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना जिंकण्याच्या तयारीला लागा असे सांगितले. हे सर्व संकेत शुभ संकेत समजून सर्व कार्यकर्ते मंगळवारी रात्री उशिरा विधानसभा क्षेत्रात पोचले आहेत. पुन्हा एकदा उत्साहाने कामाला लागले आहेत. Fadnavis insists on Guhagar’s seat