• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महायुतीच्या ७ आमदारांनी घेतली शपथ

by Manoj Bavdhankar
October 15, 2024
in Politics
230 3
0
453
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्यपाल नियुक्त कोट्यातून संधी

मुंबई, ता. 15 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याच्या काहीच तासांआधी राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी आपल्या पदाची शपथ घेतली. त्यामध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांच्यासह पोहरादेवीचे महंत बाबूसिंह महाराज राठोड, पंकज भुजबळांचाही समावेश आहे. महायुतीकडून 12 पैकी सात आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचे राजकीय गणित लक्षात घेऊन या सात जणांना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.  7 MLA of Mahayuti took oath

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर या 7 आमदारांचा शपथविधी मंगळवारी दुपारी 12 वाजता विधिमंडळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामध्ये भाजपला तीन, तर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्या आहेत. 7 MLA of Mahayuti took oath

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून  पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. 7 MLA of Mahayuti took oath

Tags: 7 MLA of Mahayuti took oathGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share181SendTweet113
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.