• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्यार्थ्यांनी दिली किल्ले रत्नदुर्गला भेट

by Guhagar News
October 8, 2024
in Ratnagiri
136 2
0
Students visited Fort Ratnadurg
268
SHARES
765
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

देव, घैसास, कीर महाविद्यालय; सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा अभ्यास

रत्नागिरी, ता. 08 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नदुर्ग किल्ल्यावर क्षेत्रभेटीतून सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा अभ्यास केला. समाजशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा अभ्यास या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरीतील सांस्कृतिक वारसा स्थळ रत्नदुर्ग येथे क्षेत्रभेटीचे आयोजन केले. Students visited Fort Ratnadurg

पर्यटन समाजशास्त्राचे सैद्धांतिक तसेच अनुभवजन्य अध्ययन करण्याच्या उद्देशाने ही क्षेत्रभेट आयोजित केली होती. पर्यटनस्थळांचे सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेऊन आधुनिक पर्यटनाचा सामाजिक दृष्टीकोनातून अध्ययन करण्यात आले. व्यावसायिक पर्यटनाची विद्यार्थ्याना माहिती देण्यात आली. सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यानी तेथील परिसराची स्वच्छता केली. या क्षेत्रभेटीचे आयोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता राड्ये यांनी केले होते. तसेच क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. Students visited Fort Ratnadurg

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarStudents visited Fort RatnadurgUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.