आ. भास्कर जाधव यांच्या दणका; आरजीपीपीएल प्रशासन नरमले
गुहागर, ता. 03 : थकित कराबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजुने निकाल देऊनही कर देण्यास टाळाटाळ करणार्या आरजीपीपीएलने आता सात दिवसात करातील 25 टक्के रक्कम देण्याची कबुली दिली आहे. कराबाबतची चर्चात्मक बैठक बोलावून आ. भास्कर जाधव यांनी कंपनी अधिकार्यांना कोंडीत पकडून दिलेल्या दणक्याने कंपनी प्रशासन नरमल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले. RGPPL will pay the amount of tax due
गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, रानवी या ग्रामपंचायतीचा सन 2021-2022 व सन 2022-2023 या दोन वर्षाचा कर आरजीपीपीएल कंपनीने थकवीला आहे. आमची सरकारी कंपनी आहे. आम्ही कर एमआयडीसीला देऊ असे म्हणत येथील तीनही ग्रामपंचायतीला कर देण्यात नकार देणार्या कंपनीच्या अधिकार्यांना अखेर निकालाप्रमाणे कराबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. अंजनवेल ग्रामपंचायतीच्या सभागृहात तीनही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख ग्रामस्थांसमवेत आ. भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी आरजीपीपीएलच्या अधिकार्यांसमवेत बैठक बोलावली होती. RGPPL will pay the amount of tax due
या बैठकीतून 3 एप्रिल 2024 रोजी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजुने निर्णय दिला असताना कंपनी कर देण्यास दिरंगाई करत असल्याचे व कंपनीने तात्काळ कराची रक्कम दयावी. असे आ. जाधव यांनी कंपनीच्या अधिकार्यांसमोर मांडले. यावेळी कंपनीचे एचआर असिस्टंट जनरल मॅनेजर स्नेहाशीश भट्टाचार्य यांनी कंपनी जिल्हा परिषदेच्या निकाला विरोधात हायकोर्टामध्ये गेल्याचे सांगितले. तर एचआर जुनिअर मॅनेजर आशिष पांडे यांनी मागील कराबाबत आपली सहकारी कंपनी कोकण एलएनजीने त्यांच्या हिश्शातील कराची रक्कम आम्हाला दिलेली नाही. यामुळे कर देता येत नसल्याचे सांगत या बैठकीतूनही टोलवाटोलवी सुरू केली होती. यावर आ. जाधव यांनी हायकोर्टात गेल्याचा पुरावा दाखवा सांगितल्यावर स्नेहाशीश भट्टाचार्य या अधिकार्याची भंबेरी उडाली. तरीही 28 एप्रिल रोजी रीटपीटीशन दाखल केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. जाधव यांनी आपला राजकीय प्रवास व अधिकारी देत असलेल्या उत्तरामुळे आता अशा पद्धतीची उडाव उत्तरे देण्याची तुमची हिम्मत कशी झाली, असे म्हणत चांगलाच दम भरला. RGPPL will pay the amount of tax due
दरम्यान अधिकार्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर माजी सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीच्या या ढोंगीपणाचा पर्दाफाश केला. कंपनीने जिल्हा परिषदेच्या निकालाविरोधात अपिल करण्याची अधिकार संपूष्टात आणला आहे. मात्र तरीही त्यांनी कोकण आयुक्तांकडे जाणे आवश्यक असताना ते हायकोर्टात गेल्याचे बोगस सांगत आहेत. हायकोर्ट त्यांचे रीटपीटीशन दाखल करून घेणार नाही. तसेच आशिष पांडे हे कोकण एलएनजीचा विषय मध्येच काढून दिशाभुल करत आहेत. करामध्ये तुमचा अंतर्गत विषय याठिकाणी येण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. तर कंपनीने कोणत्याही परिस्थितीत 2021-22, 2022-23 या दोन वर्षाचा कर निकालाप्रमाणे दिलाच पाहीजे असा ठोस मुद्दा समोर मांडला. RGPPL will pay the amount of tax due
अखेर आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषकुमार तकेले यांना फोन लाऊन तुम्ही कराची रक्कम केव्हा देता. अन्यथा बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकार्यांना सोडत नाही. असे म्हणत आ. जाधव यांनी कराचा विषय लावून धरला. सुरूवातीला एक महिन्याचा कालावधी मागीतला. परंतु शेवटी सात दिवसात तीनही ग्रामपंचायतीच्या त्यांच्या एकूण थकीत कराच्या 25 टक्के रक्कम दयावी. व तशाप्रकारची कबुली कंपनीचे सीओ संतोषकुमार तकेले यांनी मान्य केले. जर तुम्ही कोर्टात गेलात आणि त्यातून तुमच्याबाजुने निकाल लागला तर ती रक्कम परत केली जाईल. असेही अंतर्गत लिखाण करू शकता. असे यावेळी ठरविण्यात आले. या बैठकीला तीनही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, विस्तार अधिकारी शरद भांड, एमआयडीसी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. RGPPL will pay the amount of tax due