गुहागर, ता. 02 : वरचापाट येथील श्री. दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा गुरूवार दि. 03 ऑक्टोबर 24 ते अश्विन शु. नवमी शनिवार दि. 12 ऑक्टोबर 24 पर्यंत आहे. नवरात्रामध्ये 10 दिवस धार्मिक, सांगितिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन देवस्थानने केले आहे. अशी माहिती श्री दुर्गादेवी देवस्थान फंडचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली.Navratri festival at Varchapat Durgadevi temple
दि. 03 ऑक्टोबर 24 ते शनिवार दि. 12 ऑक्टोबर या दिवसात दररोज सकाळी 6 ते 6.30 वा. श्रींची षोडषोपचारे पूजा, 7.30 ते 12 वा. सप्तशती पाठवाचन, दुपारी 12 वा. महानैवेद्य, सायं 6.30 ते 7 वा. श्रींची सायंपूजा, संध्या 7.15 ते 8 वा. श्रींची गोंधळ, आरती व मंत्रपुष्प असे कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. Navratri festival at Varchapat Durgadevi temple
नवरात्र उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव शुक्रवार दि. 04/10/2024 ते मंगळवार दि. 8/10/24 दररोज दु. 3 ते सायं. 5 वा. वेळत होणार आहे. कुलदेवतेचा प्रसाद म्हणून देवीची साडी घेण्यासाठी गुहागर तालुक्याबरोबरच मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून महावस्त्रांच्या लिलावासाठी भक्त येतात. या लिलावातून देवस्थानला मिळणाऱ्या पैशांपेक्षाही मला माझ्या आईची साडी प्रसाद म्हणून मिळाली. या भावनेतून ओसंडणारी तृप्ती इथे पहायला मिळते.Navratri festival at Varchapat Durgadevi temple
विविध कार्यक्रम
गुरूवार दि. 03/10/ 24 रोजी दु. 3.30 ते सायं. 5 वा. कलावती आई भजन मंडळ, वरचापाट यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ 10 वा. समर्थ कृपा प्रॉडक्शन प्रस्तूत तूफान विनोदी लोकनाट्य.
शुक्रवार दि. 04/10/24 रोजी रात्रौ 9.30 वा. समिधा कथ्थक नृत्याची पारंपारिक व नाविन्यपूर्ण प्रस्तूती
शनिवार दि. 05/10/24 रोजी रात्रौ 10 वा. कलारंग वरवडे खंडाळा प्रस्तूत नाटक ‘मंगलाक्षता’
रविवार दि. 06/10/24 रोजी सकाळी 10 वा. कुमारिका पूजन, रात्रौ. 10 वा. कलारंग वरवडे खंडाळा प्रस्तूत संगीत नाटक ‘होनाजी बाळा’
सोमवार दि.07/10/24 रोजी रात्रौ. 9.30 वा. व्याख्यान – महिलांचे सक्षमीकरण आणि आरोग्य (वक्ते डॉ. सौ. राजश्री सोमण), रात्रौ. 10.15 वा. नागालॅड मधील मुलींचा विशेष सन्मान व पारंपारीक नृत्य व गीतागायन
मंगळवार दि. 08/10/24 रोजी रात्रौ. 10 वा. जादूगार विनयराज यांचे जादूचे प्रयोग
बुधवार दि. 09/10/24 रोजी रात्रौ. 9.30 वा. महिला रास दांडीया नृत्य, यामध्ये उत्कृष्ट नृत्य व वेशभूषा प्रत्येकी 5 बक्षीसे
गुरूवार दि. 10/10/24 रोजी रात्रौ. 8.30 वा. खास महिलांसाठी खेळ पैठणाचा कार्यक्रम व भव्य लकी ड्रा
शुक्रवार दि. 11/10/24 रोजी सकाळी 10 वा. सुवासिनी पूजन, रात्रौ. 8 वा. श्री देव गोपाळकृष्ण आरती मंडळ यांची संगित महाआरती, रात्रौ. 9.30 वा. स्वरसिंधू प्रस्तूत गीतरामायण.
शुक्रवार दि. 12/10/24 रोजी सकाळी 7 ते 12 नवचंडी व पूर्णाहूती, दुपारी 12.30 ते 2 महाप्रसाद, रात्रौ 9 ते 10 दुर्गाश्री महिला मंडळाचे भजन, रात्रौ 10 वा. किर्तन जुगलबंदी (सादरकर्ते ह.भ.प.श्री. श्रेयशबुवा बडवे व ह.भ.प. सौ. मानसी श्रेयश बडवे ) रात्रौ 12 वा. लळीतांचे किर्तन Navratri festival at Varchapat Durgadevi temple