सात स्पर्धा जिंकून विशेष विजयी कौशल्य
गुहागर, ता. 30 : गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (ॲथलेटिक्स ) नुकत्याच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाल्या. या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले आहे. Patpanhale College’s success in competitions
गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा नुकतीच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, ८००मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर धावणे, पाच कि.मी चालणे, १०० मीटर, ४०० मीटर हर्डल्स, थाळी फेक, गोळा फेक, भालाफेक, ४× १०० , ४× ४०० रीले, क्रॉसकंट्री, लांबउडी उंचउडी हे मैदानी खेळ खेळवण्यात आले. Patpanhale College’s success in competitions
पाटपन्हाळे महाविद्यालयातील १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक – तीन, रौप्यपदक – पाच, कांस्यपदक – एक, १४ वर्षांखालील मुली गटातील खेळाडूंनी सुवर्णपदक – एक, रौप्यपदक – दोन तसेच १७ वर्षांखालील मुले गटात सुवर्णपदक – सात, रौप्यपदक – चार, कांस्यपदक – तीन, १७ वर्षाखालील मुली गटात सुवर्णपदक – दोन, कांस्यपदक – तीन तसेच १९ वर्षाखालील मुले गटामध्ये सुवर्णपदक – तेरा, रौप्यपदक – दहा व कांस्यपदक – दोन तसेच १९वर्षांखालील मुली गटात सुवर्णपदक – बारा, रौप्यपदक -पाच व कांस्यपदक – पाच अशी स्पर्धेमधील ७८ पदके संपादन करून पाटपन्हाळे महाविद्यालयीन खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे कौशल्य सादर करून विजयाचे सुयश संपादन केले. दहापैकी सात रिले स्पर्धा जिंकत पाटपन्हाळे महाविद्यालयाने विजयी क्रिडा यश संपादित केले. Patpanhale College’s success in competitions
महाविद्यालयीन खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख श्रीम. एस.एस. मोरे , श्री. व्ही.व्ही. पवार, श्रीम. आरती जोशी – शिगवण, रत्नागिरी जिल्हा शारीरिक शिक्षण संघाचे खजिनदार व शारीरिक शिक्षक संघ गुहागरचे तालुकाध्यक्ष श्री. संजीव मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. गुहागर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयाने सुयश संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, पर्यवेक्षक जी. डी. नेरले, प्राध्यापक – शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी पालकांनी विशेष अभिनंदन केले. Patpanhale College’s success in competitions