गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका व परशुराम रुग्णालय, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर एकता वर्धक मंडळ असगोली वरचीवाडी समाज मंदिर येथे मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते 02 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तरी शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा. Health Camp at Asgoli Varchiwadi
या शिबीरात एका व्यक्तीच्या 60 रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत. मोफत ईसीजी व औषधे तसेच गंभीर आजारावर मोफत उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे एकता वर्धक मंडळ असगोली वरचीवाडी व अनूलोम गुहागर यांनी आवाहन केले आहे. Health Camp at Asgoli Varchiwadi