चंद्रकांत कांबरे उपचारासाठी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्याकडून एक लाखाची मदत
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल गावचा सुपुत्र आणि उत्कृष्ट क्रीडापट्टू कु. चंद्रकांत राजाराम कांबरे याला ब्लड कॅन्सर आजाराने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली आहे. चंद्रकांत हा केवळ ३० वर्षांचा असून एवढ्या मोठ्या आजाराला तो झुंझ देत आहे. Help from Pramod Gandhi to treat blood cancer
खारघर मुंबई येथील टीडब्ल्यूजे रेसिडेन्सी येथे प्रमोद गांधी यांनी भेट घेऊन त्याला वैद्यकीय मदत म्हणून एक लाख रुपयाचा धनादेश दिला. तसेच वैभव गांधी मुंढर, (सध्या वास्तव मुंबई) यांनी दहा हजार रुपये रोख स्वरूपात मदत केली. तसेच गुहागर तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तीनी आर्थिक मदत दिली आहे. कु.चंद्रकांत कांबरे हा अष्टपैलू खेळाडू असून आजवर क्रीडा क्षेत्रात त्याने कबड्डी व क्रिकेट क्षेत्रात आपले नाव जिल्हास्तरापर्यंत गाजवले आहे. त्याच्या या खेळाला दाद देणारे असंख्य चाहते आहेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारांसाठी ढोबळ खर्च पाहता सहा महिन्याच्या किमो थेरपीसाठी किमान सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच गोळ्या औषधांचा मासिक खर्च ५५ ते ६० हजार रुपये इतका आहे. Help from Pramod Gandhi to treat blood cancer
गुहागर तालुक्यातील सर्व क्रिकेट व कबड्डी खेळाडूंच्या मदतीच्या आवाहनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी तातडीने प्रतिसाद देत कुठल्याही वैद्यकीय मदतीचा फक्त देखावा न करता प्रत्यक्षात वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या चंद्रकांत कांबरे हा रहात असलेल्या खारघर येथे ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि त्याची विचारपूस करून त्याला धीर देऊन परत लढण्याची जिद्द देऊन त्याला एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्त केला. Help from Pramod Gandhi to treat blood cancer