• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्व विकासात एनएसएसचे योगदान

by Guhagar News
September 25, 2024
in Ratnagiri
148 1
1
Contribution of NSS in personality development
291
SHARES
830
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सामान्याकडून असामान्याकडे प्रवास एनएसएस मध्ये होतो;  प्रा. माणिक बाबर

रत्नागिरी, ता. 25 : विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल करण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमांमध्ये आहे. त्यातून राष्ट्राप्रती समर्पित होऊन काम करणारी पिढी निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन प्रा. माणिक बाबर यांनी केले. अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्व विकासात एनएसएसचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी व पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर उपस्थित होते. Contribution of NSS in personality development

Contribution of NSS in personality development

प्रा. बाबर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्थापने मागचा हेतू समजावून दिला. भारतात असणाऱ्या 35 लाख एनएसएस स्वयंसेवकांमध्ये आपण आहोत, याचा प्रत्येक स्वयंसेवकाने अभिमान बाळगावा. कमी वयात आपणाला समाजसेवेची संधी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे मिळते. पुढे आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मूळ उद्दिष्टांमध्ये काळानुसार बदल करून त्यामध्ये वर्तमान काळातील समस्यांवर काम करणे गरजेचे आहे यामध्ये मोबाईल एडिक्शन, वाहतूक समस्या, पालक मुलांमध्ये सुसंवाद, धार्मिक व जातीय सलोखा यावरती स्वयंसेवकांनी पथनाट्य, रॅली, परिसंवाद यांच्याद्वारे जनजागृती करावी असे सांगितले. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण करण्यात आले. Contribution of NSS in personality development

Contribution of NSS in personality development

बक्षिसपात्र विद्यार्थी – रांगोळी स्पर्धा – प्रथम – हिंदवी किर, द्वितीय – पुजा गोरे, सुखदा गावकर, तृतीय – संतोषी दमाई, गौरी सावंत, उत्तेजनार्थ – हर्षा पाथरे, विदुला कुलकर्णी आणि दीक्षा तुळसणकर, सोनाली तुळसणकर.
चित्रकला स्पर्धा– प्रथम – समृद्धी कुळये, द्वितीय – चंदना खापरे, तृतीय – खुशी जाधव, उत्तेजनार्थ – रिया सुर्वे, सुखदा गावकर
वक्तृत्व स्पर्धा- प्रथम – विदुला कुलकर्णी, द्वितीय – स्वरा पाटणकर, तृतीय– पल्लवी डोंगरे.
एकपात्री अभिनय – प्रथम – सायली कोतापकर, द्वितीय – सेजल गोविलकर, तृतीय – शरणी सुवरे.
हस्ताक्षर स्पर्धा – प्रथम – समृद्धी कुळये, द्वितीय – सानिया दळवी, तृतीय – रिद्धी बाचरे, उत्तेजनार्थ– निशिता पवार, सोहम चव्हाण Contribution of NSS in personality development

सूत्रसंचालन विदुला कुलकर्णी हिने केले. मान्यवरांचा परिचय भूमी भागवत हिने करून दिला. राज लाड याने आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. स्नेहा बाणे यांनी प्रयत्न केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांचे मार्गदर्शन लाभले. Contribution of NSS in personality development

Tags: Contribution of NSS in personality developmentGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.