गुहागर, ता. 24 : शहरातील वरचापाट दुर्गादेवीवाडी परिसरात रात्री आणि दिवसाही बिबट्याचा मुक्त संचार होतं असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. Free movement of leopards in Guhagar
वरचापाट दुर्गादेवीवाडी व इतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे वावरताना दिसून येत आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी कुत्रीही वाघाने नेल्याचे ग्रामस्थ सांगतात. रात्री आणि दिवसा बिबट्याचे दर्शन होतं असल्याने नागरिक आणि मुलांना बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. याबाबत येथील नागरिकांनी मंगळवारी नगरपंचायतीमध्ये जाऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. Free movement of leopards in Guhagar