• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पतितपावन मंदिर रंगमंचासाठी सुहासि चव्हाण यांच्यातर्फे देणगी

by Guhagar News
September 24, 2024
in Ratnagiri
147 1
0
Donation for stage by Suhasi Chavan

Donation for stage by Suhasi Chavan

288
SHARES
823
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 24 : ऐतिहासिक पतितपावन रंगमंचाच्या सुशोभिकरण व शेडसाठी भाजपातर्फे भरघोस निधीची मदत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. सुहासि रविंद्र चव्हाण यांनी ही मदत दिली. या निधीचे वितरण नुकतेच करण्यात आले. Donation for stage by Suhasi Chavan

पतितपावन मंदिराच्या आवारात असलेल्या रंगमंच नूतनीकरण, शेड उभारणी सुशोभीकरण आदींच्या कामासाठी ही मदत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि माजी आमदार बाळ माने यांनी पतितपावन मंडळाचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, अखिल हिंदू गणेश मंडळाचे अध्यक्ष मंदार खेडेकर व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे निधी सुपुर्द केला. Donation for stage by Suhasi Chavan

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की, मंत्री रविंद्र चव्हाण हे राज्याचे मंत्री असून पालघर व सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. त्यांना रत्नागिरीतून मतदान होत नाही. परंतु रविंद्र चव्हाण हे या मतदारसंघाशी मनाने जोडले गेलेले आहेत. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. सोमेश्वर येथे गोशाळेकरिताही भरघोस मदत देऊ केली आहे. भागोजीशेठ कीर यांनी उभारलेल्या या मंदिराला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वा. सावरकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. सुशोभिकरणासाठी अनिकेत पटवर्धन, शिल्पा मराठे यांनी पाठपुरावा केला. पंतप्रधानांचा वाढदिवस हे सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत आहे. या सर्व कार्यात आपणही सहभागी होऊया. Donation for stage by Suhasi Chavan

या कार्यक्रमाला महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार खंडकर, संकेत कदम, सुशांत पाटकर, धनंजय मराठे, विक्रम जैन, मोहन दामले, भाई दळी, राकेश नलावडे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. Donation for stage by Suhasi Chavan

Tags: Donation for stage by Suhasi ChavanGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share115SendTweet72
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.