माझी परंपरा नव्या पिढीनेही जपलेय; आ. जाधव
गुहागर, ता. 24 : माझ्या मतदार संघात जो कोणी येतो, त्याचा शाल, श्रीफळ देऊन मी आदर सत्कार करतो. अगदी विरोधी पक्ष नेते आले, तरीही मी त्यांचा सत्कार केला. फडणवीस, बावनकुळेंचा मी सत्कार केला. २०१९ ला मी उद्धव ठाकरेंपासून बाजूला होतो. मात्र ते गीतेंच्या प्रचारासाठी आले, तेव्हाही त्यांचा मी सत्कार केला. ही परंपरा मी जपली, नव्या पिढीही पुढे नेत आहे. मी आज पवार साहेबांना भेटलो आणि विक्रांत जाधव हाही उपमुख्यमंत्री अजितदादा यांना काल याच परंपरेच्या भावनेतून भेटला, असा खुलासा आमदार भास्करशेठ जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. MLA Jadhav met the journalists
राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार चिपळूणला आले होते. त्यांना माझा चिरंजीव विक्रांत भेटला. या संदर्भातल्या बातम्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन झाल्या, मीडियावाल्यांनी त्या चालवल्या. या पार्श्वभूमीवर मी एक प्रसंग सांगतो. १९९५ मी पहिल्यांदा आमदार झालो. घटना समितीच्या शेवटच्या मसुद्यावर ज्यांची सही होती, असे रत्नाअप्पा कुंभार यांनी माझा कोल्हापुरात सत्कार केला. मी कोणी मोठा नव्हतो, नेता नव्हतो. ८५ वर्षाच्या माणसांने माझा सत्कार का केला? याबाबत मी त्यांना विचारले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, विधानसभेमध्ये मी तुम्हाला बघतोय. कारण, तेही आमदार होते. या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला, तर पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो. काही गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या जातात. काही उच्च परंपरा जपायच्या असतात. त्या दिवसापासून माझ्या मतदार संघांमध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला, म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदार संघात आले, तरी मी त्यांचा सत्कार केला. उद्धव साहेबांपासून मी दूर होतो. २०१९मध्ये ते प्रचारासाठी आले त्यावेळीही मी त्यांचा सत्कार केला. ही उच्च परंपरा आहे, ते संस्कार आहेत. मी जपले, मी माझ्या मुलांना दिले, असे ते म्हणाले. MLA Jadhav met the journalists
मी कोल्हापुरात होतो. ना. अजितदादांचा सत्कार करा, असे मीच विक्रांत यांना सांगितले. पवार साहेब केवळ माझे नाहीत, महाविकास आघाडीचे नेते आहेत. म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा अर्धवट सोडून त्यांच्या स्वागताला या ठिकाणी आल्याचे आ. जाधव म्हणाले. या वेळी चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, माजी नगरसेवक फैसल कास्कर, बी. डी. शिंदे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बाळा आंबुर्ले आदी उपस्थित होते. MLA Jadhav met the journalists