भविष्यातील राजकीय बदलांची नांदी, चर्चेना उधाण
गुहागर, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांच्या मुलाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गुहागरच्या राजकारणात या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. Assembly Elections
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच जनसन्मान यात्रेनिमित्त राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे चिपळूण येते आले होते. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे गुहागर मतदार संघांचे आ. भास्कर जाधव यांचे पुत्र आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी माटे सभागृहात जाऊन अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेत पुष्पगुच्छ देत आशीर्वाद घेतले. त्यामुळे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. तसेच क्षणाधार्त या भेटीचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, विक्रांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता आ. भास्करशेठ जाधव सहकुटुंब बाहेर गेले आहेत. त्यामुळे अजितदादांचे स्वसगात मी केले. ही भेट राजकीय नव्हती, असा खुलासाही त्यांनी केला आहे. Assembly Elections
उद्धव ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव यांचे पुत्र गुहागर तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. पहिल्याच राजकीय कारकिर्दीत त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देखील मिळाले. आ. जाधव यांच्यासारखी वक्तृत्व शैली यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कामाचा ठसा उमठवीला. काही दिवसांपूर्वी विक्रांत जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच उद्धव ठाकरे गटाच्या गुहागर तालुक्यातील बैठकांमध्ये आगामी निवडणुकीत “जाधव” कुटुंबातीलच उमेदवार असेल, असे पदाधिकारी सांगताना दिसत होते. त्यामुळे आ. भास्कर जाधव कि विक्रांत जाधव या मतदार संघात उमेदवार असणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. Assembly Elections
दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून चिपळूण मतदार संघात आता शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांचे नावं पुढे आले आहे. त्यामुळे आमदार जाधव यांना आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी सुरक्षित मतदार संघ म्हणून गुहागरची निवड करावी लागणार आहे. तर आ. जाधवांचे काय, हाही प्रश्न उपस्थित होतो. आ. जाधव यांनी शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांचे नावं पुढे येण्याआधी चिपळूणचे प्रतिनिधित्व करण्याचे अनेकवेळा बोलून दाखविले होते. त्यांची आजही चिपळूण मतदार संघावर चांगली पक्कड आहे. विक्रांत जाधव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. विक्रांत जाधव यांनी घेतलेली भेट सदिच्छा भेट होती कि येणाऱ्या निवडणुकीतील परिवर्तनची नांदी होती, हे येणारा कालच ठरविणार आहे. Assembly Elections