ब्रेक द चेनमध्ये आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासाला बंदी
गुहागर, ता. 23 : आपल्याला आपल्या जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा आहे. मग आता तुम्हाला ई पास काढणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांमध्ये जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणालाही आपल्या जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असेल तर ई पास काढणे बंधनकारक बनले आहे. ( If your want to travel inter state / inter District, Now E Pass is essential.)
तुम्ही काढा तुमचा ई पास
ई पास काढण्याची पूर्व तयारी
ई पास काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाहनाची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत ना याची खात्री करा. (Vehicle Papers)
ई पास ज्याला काढायचा आहे त्याने स्वत:चा पासपोर्टसाईज फोटो, आधारकार्डचा फोटो जवळ ठेवावा. (Passport Size Photo and Aadhaar Card)
ज्या कारणासाठी जायचे आहे असे सबळ कारणाचा सरकारी पुराव्याचा फोटो काढावा.
आपले लसीकरण झाले असेल तर त्याचे सर्टीफिकेट सोबत ठेवा. (Vaccination Report)
लसीकरण झाले नसेल तर प्रवास करण्याआधी आरटीपीसीआर तपासणी (RTPCR Test) करुन घ्या. या तपासणीचा अहवाल येण्यास किमान ३ दिवसांचा कालावधी लागतो. आरटीपीसीआर अहवाल सोबत ठेवा.
आता आपण महाराष्ट्र पोलीसांच्या संकेत स्थळावर जायचे आहे.
त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://covid19.mhpolice.in/
या लिंकवर क्लिक केल्यावर समोर Apply for New Pass व Download Pass असे दोन ऑप्शन दिसतील.
त्यातील Apply for New Pass या चौकानाच्या तळाला Apply for Pass Here असे लिहिलेला एक चौकोन दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यावर एक पॉपअप विंडो समोर येते. तेथील योग्य तो पर्याय निवडा.
त्यानंतर खालील फॉर्म भरताना संपूर्ण सत्य माहिती भरा.
आपण भाड्याची गाडी करुन जाणार असाल तर ड्रायव्हरचे नाव लिहिताना कंसात ड्रायव्हर असा उल्लेख करा.
ड्रायव्हरला सहप्रवाशांच्या यादीत सहभागी करु नका.
ड्रायव्हर आपल्याला सोडून पुन्हा वाहन घेवून परतीचा प्रवास करणार असेल तर रिर्टन जर्नीचा (परतीचा प्रवास) तपशील नमुद करा. तेथे सहप्रवाश्यांची संख्या ‘0’ लिहा.
आता तुम्हाला तुमची कागदपत्रांचे फोटो जोडायचे आहेत. त्यासाठी आपल्या कागदपत्रांचे फोटो कमी साईजमध्ये क्रॉम्प्रेस करुन घेण्याचा ऑप्शन दिलेला आहे. त्याचा वापर करा.
आपला फोटो, आपले आधारकार्ड जोडा. त्या खालील मेनूत आपले फिटनेस सर्टीफीकेट (लसीकरणाचा दाखला किंवा आरटीपीसीआर दाखला जोडा)
त्यानंतर Submit या शब्दावर क्लिक करा.
जर क्लिक झाल्यावर टोकन नंबरची विंडो आली नाही तर तुम्ही वरच्या माहितीमधील कोणता तरी मुद्दा भरलेला नाही/चुकीचा भरला आहे. ते तपासा.
Submit या शब्दावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक टोकन नंबर मिळेल.
हा टोकन नंबर लक्षपुर्वक लिहून घ्या. किंवा मोबाईलवरुन स्क्रीनशॉट काढा.
आता आपला पास मंजूर झाला आहे का हे तपासण्यासाठी सुमारे तीन तासांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीसांच्या संकेतस्थळावर जा.
https://covid19.mhpolice.in/
या संकेतस्थळावर Apply for New Pass च्या चौकोटीजवळ Download Pass अशी दुसरी चौकट आहे. त्या चौकटीच्या तळाशी जा.
तेथे Check Status/Download Pass असे शब्द लिहिलेला चौकान आहे. त्यावर क्लिक करा.
तुमच्या समोर स्वतंत्र विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये Enter Token ID Here असे लिहिलेला चौकोन असेल. त्यामध्ये तुमचा टोकन नंबर टाका.
त्यानंतर Submit या शब्दावर क्लिक करा.
जर तुमचा पास बनला असेल तर तुम्हाला समोर पास दिसेल तो मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरुपात सेव्ह करता येईल. पास बनला नसेल तर तुमच्या पासचा रिव्ह्यु घेतला जात आहे. असा संदेश मिळेल.
लक्षात ठेवा जोपर्यत तुमचा पास तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी नाही. प्रवास करताना तुमच्याकडे १० दिवसांच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट असणे बंधनकारक आहे. हा अहवाल नसेल तर तुम्हाला पोलीस चेकपोस्टवर अडवून तुमची अँटीजेन टेस्ट करतात. दुर्दैवाने तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तेथे नमुद केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तुम्हाला भरती केले जाते. तेव्हा चाचणी न करता प्रवास करु नका. ही विनंती.