गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत येथील नवतरुण मुलांनी एकत्र येऊन सहयोग फाउंडेशन, पालशेत ही संस्था चालु केली होती. या संस्थेला १ वर्ष पूर्ण झाले असून दि. ११ /०९ /२०२४ रोजी प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष श्री.अशोक झिंबर ह्यांनी आपले मनोगत मांडून सर्वाना शुभेच्या दिल्या. Anniversary of Sahyog Foundation Palshet
या संस्थेने वर्षभरात विविध कार्येक्रम, ऑनलाईन स्पर्धा, शाळेला भेटवस्तू, गरजू लोकांना मदत, तसेच वर्धापन दिनानिमित्त स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम अशी बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपस्थित कलानिकेतन झिंबरवाडीतील अध्यक्ष श्री.मुरलीधर डाकावे, श्री .अजित फटकरे, सुधाकर झिंबर, श्री .सुरेश झिंबर, श्री .गोपाळ झिंबर, श्री प्रदीप झिंबर, श्री .सुभाष फटकरे, श्री .राजेंद्र झिंबर, श्री.अनिल झिंबर, श्री .अनंत गोरीवले, श्री .जनार्धन डाकवे, श्री .अरुण झिंबर, सौ.प्रीती फटकरे, सौ.अनुजा गोरीवले मान्यवर उपस्थित होते. Anniversary of Sahyog Foundation Palshet