टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका
गुहागर, ता. 13 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी – गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने समुद्र किनारी गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात सायंकाळी उशिरापर्यंत शांततेत विसर्जन करण्यात आले. यासाठी गुहागर समुद्र किनारी नगरपंचायतीने घरातील फुलारसाठी निर्मळ कलश ठेवले होते. तसेच विसर्जनासाठी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आपले कर्मचारी तैनात ठेवले होते. Immersion of Gauri Ganapati in Guhagar