• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवात खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची दिवाळी!

by Ganesh Dhanawade
September 10, 2024
in Guhagar
172 1
0
Private Travels charging more than ST
337
SHARES
963
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एसटी पेक्षा जास्त भाडे आकारणी

गुहागर, ता. 10 : गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने आलेल्या गणेश भक्तांना परत आपल्या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सवाले प्रचंड भाडे आकारीत असून हि गणेश भक्तांसाठी लूट सुरू झाली आहे. गुहागर ते मुंबई प्रवासी या लुटीमुळे हतबल झाले आहेत. गुहागरहून एस.टी. पेक्षा जास्त पैसे हे चाकरमानी नाईलाजाने मोजत असून खाजगी ट्रॅव्हलवाल्यांची जणू दिवाळीच सुरु आहे. Private Travels charging more than ST

गणेशोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने येत आहेत.  रेल्वेने येणे गुहागर तालुक्यातील प्रवाशांना सुलभ वाटत नाही. मुंबई पुण्यातून आपल्या घरी सणासुदीला येताना प्रत्येका जवळ बऱ्यापैकी सामान असते. ते गुहागरला येताना अनेक वाहने बदलावी लागतात. त्यामुळे गुहागर तालुक्यातील प्रवासी आपल्या गावात थेट येण्याचा मार्ग स्विकारतात. सद्या तालुक्यातील बहुसंख्य गावातून अशा खाजगी ट्रॅव्हल्स सुटतात. सायंकाळी घरात जेवण करून निघालेला प्रवासी पहाटे मुंबईत थेट विरारला पोचतो. सकाळी उठून आपला कामधंदा वा नोकरी गाठणे त्याला सहज शक्य होते. शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास न होता ट्रॅव्हल्सवल्याच्या पुशबॅकमुळे आरामदायी प्रवास होतो. मात्र, गुहागर तालुक्यातील खेडेगावच्या अशा प्रवाशांची एसटी पेक्षा ट्रव्हल्सला असलेली पसंती लक्षात घेऊन त्यांनी सिझनला प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे. Private Travels charging more than ST

या गणेश उत्सव काळात गावी येणाऱ्या चाकरमान्यांना परत जाण्यासाठी काही ट्रॅव्हल्सवाल्यांनी 800 रुपये तर काहींची मजल तेराशे तर दिड हजारापर्यंत गेली आहे. वेगवेगळ्या खाजगी मालकांच्या सुमारे १५ ते २० गाडया दररोज गुहागरच्या विविध भागातून सुटत आहेत. शृंगारतळीची बाजारपेठ या गाड्याचे मोठे स्टँडच झाले आहे. या उलट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गुहागर – ठाणे, पुणे व मुंबई उपनगरात जाण्यासाठी बसेस आहेत. परंतु, गुहागर तालुक्यातील प्रवाशांच्या एसटीची लालपरी डोक्यात बसली असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाने महिलांना अर्धे तिकीट केल्याने, बसला बऱ्यापैकी प्रवासी असतात.  शिवाय जेष्ठ नागरिक, लहान मुले यांना प्रवासात सवलत आहे. तरीही लोकांची मानसिकता बदलेली नाही. किंवा एसटी अधिका-यांनी ती बदलण्यासाठी तसदी घेतलेली नाही. म्हणून एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल अशी गुहागरची स्थिती आहे. Private Travels charging more than ST

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPrivate TravelsPrivate Travels charging more than STUpdates of Guhagarखाजगी ट्रॅव्हल्सगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share135SendTweet84
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.