गुहागर, ता. 09 : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलीत भक्तश्रेष्ठ कमलकरपंत वालावलकर रुग्णालय सावर्डे येथे एका लहान मुलांवरती मेंदूच्या कवटीवरील’ न्यूरो सर्जरी वालावलकर रुग्णालयांचे न्यूरो सर्जन डॉ. मुदूल भटजीवाले यांनी यशस्वीपणे केली. Brain Surgery at Walawalkar Hospital
दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी फोर व्हिलर गाडी समोरून येऊन धडकल्याने अपघातात सापडलेल्या चार मुलांना वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यांच्यावर ताबडतोब वालावलकर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. अपघात झालेली मुले ही नयशी गावाची होती, परंतु गाडीतील ९ वर्षाच्या मुलाला अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे आकडी येऊन, तोंडातून फेस येत होता. त्याला बेशुद्ध अवस्थेत वालावलकर रुग्णालयातील आय. सी. यू विभागात ताबडतोब ऍडमिट करण्यात आले. Brain Surgery at Walawalkar Hospital
न्यूरो सर्जन डॉ. मुदूल भटजीवाले यांनी रूग्णाची तपासणी केली. त्वरित रुग्णांवर उपचार सुरु केले. रुग्णांचा सी.टी. स्कॅन रेडिओलॉजी विभागांतील प्रोफेसर डॉ. आनंद गजकोष यांनी केला. सी.टी. स्कॅनमध्ये रुग्णांच्या कवटीला फ्रॅक्चर असल्याचे सिद्ध झाले. तुटलेले हाड आत मेंदूमध्ये घुसले होते. ह्या फ्रॅक्चरमुळे मेंदूला लागलेल्या मारामुळे रुग्णाला आकडी आली होती व रुग्ण बेशुद्ध झाला होता. डॉ. मुदूल भटजीवाले न्यूरो सर्जन व डॉ. श्रेया (सर्जन) यांनी ९ वर्षांच्या रुग्णांवर ब्रेन सर्जरी करून कवटीचे फ्रॅक्चर जे मेंदूत आत घुसलेले होते ते शास्त्रक्रिया करून व्यवस्थीत केले. ह्या लहान मुलाला शस्त्रक्रिया करतेवेळी भूल देण्याचे काम वालावलकर रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. गौरव बावीसकर, डॉ. शिवानी. डॉ. सलोनी यांनी केले . शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आता पूर्णपणे शुद्धीत आहे. जीवदान मिळाले म्हणून नातेवाईकांनी रुग्णालयाचे आभार मानले. या शिवाय ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेत संपूर्णपणे मोफत झाल्याने पालकांना दिलासा मिळाला. Brain Surgery at Walawalkar Hospital