गणेशोत्सवाचे वातावरण असताना चिपळूणमध्ये उडाली एकच खळबळ
रत्नागिरी, ता. 08 : चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तरूणाचा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या प्रकाराने चिपळूण शहर हादरले आहे. Dead body of youth in Chiplun
सगळीकडे गणेशोत्सवाचे आनंदाचे वातावरण असताना चिपळूणमध्ये मात्र एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. तोही रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने चिपळूण शहरात एकच खळबळ माजली आहे. हा हादरवून टाकणारा संपूर्ण प्रकार आज रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. बहादूर शेख नाका हे चिपळूणमधील गजबजलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. अशा या गजबजलेल्या ठिकाणी तरूणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने हे चिपळूण पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे. Dead body of youth in Chiplun