सलग ९ व्या वर्षीहि यांची बिनविरोध निवड
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच मनाली महेंद्र कदम याचे अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह रानवी बौध्दवाडी येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.संदीप शंकर कदम यांची सलग ९ व्या वर्षीही सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. Ranvi Tantamukti Samiti President Sandeep Kadam
श्री.संदीप शंकर कदम हे गेली ८ वर्षे गावामध्ये तंटामुक्ती समीती अध्यक्ष म्हणून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन गावाचा एकोपा संघटित ठेवण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. दुसऱ्याच्या सुख – दु:खात मदतीला ते धावून जातात अशी त्यांची ओळख आहे. या सभेला सरपंच मनाली कदम, उपसरपंच दिनेश बारगोडे, माजी सरपंच व सदस्य विनोद चोगले, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी बारगोडे, मयुरी चोगले, सुहास चोगले, ग्रामविकास अधिकारी, श्री.राजकुमार प्रक्षाळे, माजी सरपंच महेंद्र काजारे, पोलीस पाटील हेमंत शिगवण, अंगणवाडी सेविका श्रीमती. जावळेमॅडम, महेंद्र कदम, संदेश कदम याचेसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. Ranvi Tantamukti Samiti President Sandeep Kadam