गुहागर, ता. 02 : कोतळूक ग्रामपंचायत सदस्य, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष श्री सचिन मुकुंद ओक यांची सलग तिसऱ्यांदा महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोतळूक अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. कोतळूक ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच कावणकरवाडी अंगणवाडी सभागृह सरपंच सौ प्रगती मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांबरोबरच महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोतळूक अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. Kotaluk Tantamukt Committee President Sachin Oak
सचिन ओक हे कोतळूक ग्रामपंचायत सदस्य म्हणून सलग तिसऱ्यांदा कार्यरत आहेत तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करत असल्याने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा त्यांची अध्यक्षपदावर निवड केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गुहागर अध्यक्ष, देवस्थान समितीचे सदस्य, तसेच विविध पदांची जबाबदारी पेलत सामाजिक, क्रिडा, शिक्षण, सांस्कृतिक कामकाजात त्यांचा सक्रीय सहभाग असल्याने त्यांनी आपल्या कार्याचा दबदबा निर्माण केला आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे, गावात तंटे होणार नाहीत, सलोखा राहील याची काळजी घेणे, तरीही तंटे निर्माण झालेच तर स्थानिक पातळीवर निःपक्षपातीपणे समिती सदस्यांना विश्वासात घेऊन ते मिटविण्यासाठी प्रयत्न करून सामाजिक, प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन ओक यांनी सांगितले. Kotaluk Tantamukt Committee President Sachin Oak